Shani Mangal Ketu Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करीत शुभ-अशुभ योग तयार करतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती आहे; तर मीन राशीत शनी मंगळाचा षडाष्टक योग तयार होत आहे. यासह मंगळ आणि केतूच्या युतीमुळे कुजकेतू योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग खूप धोकादायक मानले जातात. हा विनाशकारी योग २८ जुलैपर्यंत राहणार आहे, ज्यामुळे काही राशींच्या समस्या वाढू शकतात. त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
मेष
मंगळ, केतू व शनी युती मेष राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. या काळात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराबरोबर काही तणावपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनाही या काळात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. गुंतवणुकीच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा.
सिंह
शनी-मंगळाचा षडाष्टक योग आणि मंगळ-केतूचा कुजकेतू योग सिंह राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. या काळात तुम्हाला आरोग्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला कुटुंब आणि करिअरबद्दल काळजी वाटू शकते. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतात; पण तुम्ही शांततेने परिस्थिती हाताळा. करिअरमध्ये आव्हान येतील; पण काळजी करू नका.
कन्या
शनी, मंगळ व केतूची युती कन्या राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकते. या काळात तुमचे खर्च खूप वाढू शकतात. तुम्हाला शत्रूंचा त्रास होऊ शकतो. तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे तणावात असाल. यावेळी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निराशा पदरी पडू शकते.