Shani Gochar: दरवर्षी शनी आपली रास बदलत नाहीत, पण त्यांची चाल नेहमी बदलत राहते. शनीदेव कर्माचे फळ देणारे आणि न्यायाधीश म्हणून ओळखले जातात. सध्या शनी मीन राशीत आहेत. या वेळेस शनी उलट चालेत आहेत. पंचांगानुसार, शनी २८ नोव्हेंबरपासून मार्गी (सोप्या आणि सरळ चालेत) होतील.
शनी देवांना सर्व राशींचा एक फेरा पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० वर्षांचा वेळ लागतो. मीन राशीत शनी ३० वर्षांनी मार्गी होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस शनी मीन राशीत सरळ चालेत जाणार आहेत. चला तर मग पाहूयात, शनी कोणत्या राशींसाठी फायद्याचे आहेत.
तूळ राशी (Libra Horoscope)
मीन राशीत ३० वर्षांनी शनी मार्गी होणार असल्याने तूळ राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये तुम्हाला नशीब चांगले साथ देईल. पैशांमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन गुंतवणूकदार मिळू शकतात. कामाच्या कारणाने परदेशात प्रवास करावा लागू शकतो.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मीन राशीत ३० वर्षांनी शनी मार्गी होणार असल्याने मकर राशीच्या लोकांसाठी काळ शुभ राहील. कुटुंबाच्या मदतीने सर्व अडचणी दूर होतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. पैसे आणि संपत्ती मिळण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीत ३० वर्षांनी शनी मार्गी होणार असल्याने मिथुन राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. पैसे येण्याचीही शक्यता आहे. तुमचा आत्म-सन्मान वाढेल. मुलांशी संबंधित काही शुभ बातमी मिळू शकते. ऑफिसचे सर्व काम व्यवस्थित पार पाडता येईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
