Shani Vakri 2024: न्यायाची देवता म्हटला जाणारा शनिदेव जर ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असेल तर त्याचा निश्चितपणे बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. अशा परिस्थितीत, एका राशीत परत येण्यासाठी साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो. शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे. शनी एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतो. आता शनिदेव २९ जून २०२४ रोजी रात्री ११.४० वाजता पूर्वगामी म्हणजेच वक्री होणार आहे. वक्री म्हणजे उलट चाल होय. नोव्हेंबर पर्यंत शनिदेव याच स्थितीत राहणार आहेत. शनि ग्रह १३५ दिवस वक्री राहणार आहे. शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे काही राशींना अपार पैसा, सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. शनिच्या चालीमुळे कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊयात…

शनिदेव ‘या’ राशींच्या नशिबाला देतील कलाटणी?

मेष राशी

शनिदेवाची वक्री चाल मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

(हे ही वाचा: ७ दिवसांनी ‘या’ ४ राशींचे दिवस बदलतील? चार शुभ राजयोग घडून येताच माता लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येईल दारी!)

वृषभ राशी

शनिदेवाची वक्री चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करु शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

कन्या राशी

शनिदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा लाभण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)