Shani Dev Vakri : वैदिक पंचांगनुसार, जून महिना हा ग्रह गोचरसाठी खास असणार आहे. जूनमध्ये सूर्य, शुक्र, बुध सह शनिसुद्धा त्याची चाल बदलून वक्री करणार आहे. शनिची उलट चाल काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
सर्वात आधी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर यूरेनस वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १२ जूनला सुख समृद्धीचा दाता शुक्र ग्रह गोचर करणार आहे. १ जूनला सूर्य सुद्धा गोचर करणार आहे. याशिवाय बुध ग्रह सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे. २९ जून रोशी शनि सुद्धा त्याच्या त्रिकोण कुंभ राशीमध्ये वक्री करणार आहे. हे सर्व गोचर अत्यंत शुभ असून या गोचरचा काही राशींवर सकारात्मक दिसून येईल. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.

मेष राशी

जून महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशीसाठी फायद्याचे ठरू शकते. या राशीच्या लोकांची नोकरी व्यवसायात प्रगती होऊ शकते. कोणता शुभ वार्ता मिळू शकते ज्यामुळे या राशीच्या लोकांना आनंद मिळेल. या लोकांना यात्रेचे योग येईल. या लोकांना नोकरीची संधी मिळेल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल.

वृषभ राशी

जून महिना वृषभ राशीसाठी शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या लोकांच्या घरात मंगल कार्य होतील. संपत्तीसंबंधित मोठे काम पूर्ण होणार. नवीन घर गाडी खरेदी करता येईल. घर खरेदी करू शकता. करिअरच्या दृष्टीकोनातून वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना फायद्याचा ठरू शकतो. पगारवाढ पदोन्नती मिळू शकते. प्रभावी लोकांबरोबर या लोकांची ओळख निर्माण होईल. व्यवसायात पैसा वाढेल.

हेही वाचा : २७ मे पंचांग: कमाईत वाढ, गोडीगुलाबीचं जीवन, मे महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा जाईल? वाचा आजचं भविष्य

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुधारणा दिसून येईल. खूप काळानंतर त्यांचे आयुष्य योग्य मार्गावर येईल. या लोकांना व्यावसायिक जीवनात प्रगती करण्याची संधी मिळेल. या लोकांची कमाई वाढेल. जुन्या समस्या दूर होतील. मान सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कन्‍या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. या लोकांना करिअरमध्ये लाभ मिळेल. काही लोकांचे महत्त्वाचे काम पूर्ण होतील. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. वैयक्तिक आयुष्यात चढ उतार दिसून येईल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)