Shri Ram Favourite Zodiac : आज अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या निमित्त्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. देशभरातील रामभक्त उत्साहाने हा उत्सव साजरा करत आहे. तुम्हाला प्रभू श्रीरामाच्या प्रिय राशी माहितीये का? आज आपण याच राशींविषयी जाणून घेणार आहोत. या राशींच्या लोकांवर रामलल्लाची नेहमी कृपा असते. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.

तुळ

ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीच्या लोकांवर नेहमी रामाची कृपा असते. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीचे लोक खूप धार्मिक असतात. हे लोक नेहमी धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होतात. रामचंद्राचा आशीर्वाद यांच्यावर नेहमी असतो. हे कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्यास तयार राहतात.

मिथुन

मिथुन राशीचे लोक रामाचे प्रिय मानले जातात. जीवनात येणाऱ्या समस्यांपासून श्रीराम नेहमी वाचवतात.हे लोक नेहमी उच्च पदावर कार्यरत असतात. कोणत्याही कठीण परिस्थितीचा ते सहज सामना करतात. हे लोक जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी कमावतात.

हेही वाचा : ‘या’ चार राशींवर वर्षभर राहील शनिदेवाची विशेष कृपा, सर्व काही मनाप्रमाणे होईल; तुमची रास यात आहे का?

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे लोक रामाचे खूप प्रिय असतात. यांच्यावर नेहमी रामाची कृपा असते. या लोकांना नेहमी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. रामाच्या कृपेने या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक गोष्टी सुधारण्याची संधी मिळते. कुटूंबात सुख समृद्धी लाभते.

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि मीन राशीवर रामाची कृपा नेहमी असते. श्रीरामाच्या कृपेने यांच्या आयुष्यात नेहमी धन संपत्ती आणि समृद्धी दिसून येते. मीन राशीच्या लोकांना समाजाच उच्च पद, यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ

ज्योतिषशास्त्रनुसार कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. हे लोक अत्यंत मेहनती असतात. या लोकांवर नेहमी रामाची कृपा असते. मेहनतीच्या जोरावर ते आयुष्यात भरपूर यश मिळवतात. रामाच्या कृपेमुळे वाईट परिस्थितीत सुद्धा ते हार मानत नाही. ध्येय प्राप्तीसाठी कठीण परिस्थितीचा सामना करतात.