Dwidwadash Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, दैत्यांचा गुरू शुक्र हा एक शक्तिशाली ग्रह मानला जातो, जो सुमारे २६ दिवसांत राशिबदल करतो. यावेळी तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करतो, ज्यामुळे अनेक शुभ राजयोग निर्माण होत असतात. शुक्र सध्या मिथुन राशीत स्थित आहे. जिथे गुरू आधीच विराजमान आहे. दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. तर, १ ऑगस्ट रोजी शुक्र आणि युरेनस ग्रहामुळे द्विद्वादश योग निर्माण होत आहे. त्यामुळे १२ पैकी तीन राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतात; पण कोणत्या राशींच्या लोकांना याचा फायदा होईल ते जाणून घेऊ…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजून मिनिटांनी शुक्र आणि युरेनस हे ग्रह एकमेकांपासून ३० अंशांवर असतील, ज्यामुळे द्विद्वादश योग तयार होईल. सध्या शुक्र मिथुन राशीत आहे आणि युरेनस वृषभ राशीत स्थित आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र – युरेनसचा द्विद्वादश योग फलदायी ठरू शकतो. या काळात तुमच्या करिअरवर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना बोनस, अप्रायजल मिळू शकते. त्यामुळे पगारवाढीची शक्यताही आहे. त्यासह नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना फायदा होईल. वैवाहिक जीवनही चांगले राहणार आहे. जोडीदारासह सुरू असलेला कलह संपू शकतो. तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते.

तूळ

शुक्र-युरेनसचा द्विद्वादश योग तूळ राशीसाठी अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम दाखवू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. ते धार्मिक बाबींमध्ये उत्साहाने सहभागी होऊ शकतात. समाजात मान-सन्मानातही जलद वाढ होऊ शकते. कामाच्या निमित्ताने तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो; परंतु याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ

शुक्र-युरेनसचा द्विद्वादश योग कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रांत यश मिळवून देऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासह तुमचे नाते अधिक मजबूत होऊ शकते. तुम्हाला कोर्ट केसेसमध्येही यश मिळू शकते. भागीदारीत होणाऱ्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकते. त्यासह तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना परीक्षेत यश मिळू शकते.