Shukra Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशींमध्ये गोचर करतात. सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. आज ७ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी शुक्राने शनिदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्यात आयुष्यात सुखात वाढ होते, असे म्हटले जाते. शुक्र गोचरमुळे कुठल्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो, जाणून घेऊया…

‘या’ राशींचे सुखाचे दिवस होणार सुरु?

वृषभ राशी

या राशीमध्ये शुक्राने दहाव्या भावात गोचर केलं आहे. या काळात वृषभ राशीच्या व्यवसायाशी निगडित लोक प्रचंड यश प्राप्त करु शकतात. नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरु शकते. बेरोजगारांना चांगली नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या कालावधीत विद्यार्थ्यांनाही परीक्षेत यश मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. 

Shukra Ast in Mesh
येत्या ४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा? मेष राशीत शुक्रदेव अस्त होताच बँक बँलेन्समध्ये होऊ शकते वाढ
Budh Gochar May 2024
१० मे पासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा बुधदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस
Chaturgrahi Yog
४८ तासांनी ४ ग्रहांची महायुती; येत्या मंगळवारपासून ‘या’ राशी पैशाच्या बाबतीत ठरतील भाग्यवान? कुणाच्या संपत्तीत होणार वाढ?
Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ

(हे ही वाचा : होलाष्टकात होणार शनिदेवाचा उदय! १८ दिवसांनी ‘या’ राशींना होणार धनलाभ? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी )

कर्क राशी

या राशीच्या आठव्या भावात शुक्राने गोचर केलं आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर फायदेशीर ठरु शकते. यावेळी तुमचं नशीब तुम्हाला साथ देऊ शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. सुख सुविधांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीमध्ये वाढ  होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहण्याची शक्यता आहे.

धनु राशी

शुक्राने या राशीच्या तिसऱ्या भावात गोचर केलं आहे. धनु राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या कालावधीत महागडी वस्तू खरेदी करू शकता. वाहन आणि घर खरेदीचा योग जुळून येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. समाजात मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)