Shukra Gochar 2025 : शुक्र ग्रहाला धन ऐश्वर्याचे कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र २८ जानेवारी रोजी राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र मीन राशीमध्ये गोचर करणार आहे ज्यामुळे मालव्य नावाचा राजयोग निर्माण होत आहे. शुक्राच्या गोचरमुळे निर्माण झालेल्या मालव्य राजयोगाचा शुभ प्रभाव राशीचक्रातील पाच राशींवर विशेष दिसून येईल. शुक्र देव त्याच्या उच्च राशीमध्ये विराजमान होत असल्याने पाच राशींना भौतिक सुख सुविधांचा लाभ मिळणार. जाणून घेऊ या, मालव्य राजयोग कोणत्या पाच राशींना लाभदायक ठरू शकतो.

वृषभ राशी

शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या अकराव्या स्थानावर आहे. अशात शुक्र गोचर फायद्याचे ठरू शकते. मालव्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होणार. संबंधांमध्ये गोडवा जाणवेल. या दरम्यान शत्रूंबरोबर मैत्री होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वृद्धी होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. विवाहित जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेन. कामामध्ये गती मिळेन. जे काम दीर्घ काळापासून अडकलेले आहे ते मार्गी लागतील.

मिथुन राशी

शुक्र देव या राशीच्या १० व्या स्थानावर विराजमान होणार आहे. अशात शुक्राचे गोचर या लोकांना करिअरमध्ये भरपूर लाभ देईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याचे सहकार्य लाभेल. नात्यामध्ये गोडवा जाणवेल. विदेशात करिअर घडवण्याची संधी मिळू शकते. आयात निर्यातच्या कामामध्ये आर्थिक लाभ मिळू शकतो. कार्य क्षेत्रात खास व्यक्तीबरोबर भेट होऊ शकते. पगारात वाढ होऊ शकते.

कर्क राशी

शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन आणि त्यापासून निर्माण होणार्‍या मालव्य राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. शुक्र देव या राशीच्या ९ व्या स्थानावर गोचर करणार आहे. शुक्राचे गोचर कर्क राशीच्या लोकांना फायदेशीर ठरेन. धार्मिक कार्यामध्ये ऋची वाढेन. तिर्थस्थानी प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. व्यवसानिमित्त विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या दरम्यान नशीबाची चांगली साथ मिळेन. वाहन सुख अनुभवू शकता.

सिंह राशी

शुक्राचा हा गोचर सिंह राशीच्या आठव्या स्थानावर निर्माण होणार आहे. शुक्र गोचरच्या शुभ प्रभावामुळे या लोकांची लव्ह लाइफ उत्तम राहीन. करिअरमध्ये या लोकांची विशेष प्रगती होईल. वाणीमध्ये मधुरता दिसून येईल. वैवाहिक जीवनात सासरकडून शुभ वार्ता ऐकायला मिळेल. कामाचा वेग वाढेन. व्यवसायात अडकलेल्या कामात यश मिळेन. सुख संपत्ती प्राप्त होईन.

धनु राशी

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे गोचर धनु राशीच्या चौथ्या स्थानावर निर्माण होणार आहे. शुक्र गोचरमुळे निर्माण होणार्‍या मालव्य राजयोग या राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. शुक्र गोचर दरम्यान या लोकांना वाहन सुख प्राप्त होईल. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. गोचर दरम्यान कौटुंबिक जीवनात आनंद मिळेन. कार्य क्षेत्रात प्रगतीचे योग जुळून येईल. सुख समृद्धीमध्ये वृद्धी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)