Nav Pancham Raj Yog 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन- वैभव, प्रेम- आकर्षण व सौंदर्य यांचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये शुक्र ग्रह उच्च किंवा लाभस्थानी असल्यास याचा प्रभाव अनेक राशींच्या प्रेमाच्या नात्यात, आर्थिक बाजूवर दिसून येऊ शकतो. वैदिक पंचांगानुसार, भौतिक सुख व ऐश्वर्याचा कारक मानला जाणारा ग्रह शुक्राने ३१ मे २०२५ रोजी आपली राशी बदलेली आहे. शुक्र ग्रहाने मंगळाच्या मेष राशीत प्रवेश केला आहे. या राशीचा स्वामी मंगळही ७ जून रोजी सिंह राशीत म्हणजेच सूर्याच्या घरात प्रवेश करणार आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या नवम आणि पंचम भावात येतात आणि त्यामुळे अत्यंत शुभ नवपंचम राजयोग घडून येतोय. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांची कोणत्या रूपात भरभराट होऊ शकते हे पाहूया.
नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे ‘या’ राशी अमाप संपत्तीच्या धनी होतील?
कर्क (Cancer)
ज्योतिषशास्त्रानुसार, नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे कर्क राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आयुष्यात करिअर आणि आर्थिक लाभाच्या दिशेने मोठे सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. वडिलांच्या, सल्लागारांच्या आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने यशस्वी होऊ शकता. रिअल इस्टेट आणि एजंटसाठी हा चांगला काळ ठरु शकतो. नोकरीत नवीन संधी आणि प्रतिष्ठेचे पद मिळण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप अनुकूल ठरू शकतो. या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना नवीन प्रकल्प, सौदे आणि नफ्याचे सौख्य लाभू शकते. व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.
वृश्चिक (Scorpio)
ज्योतिषशास्त्रानुसार, नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात. बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तसेच शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याची शक्यता आहे. सामाजिक सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)