Vipreet Raj Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याचे एका महिन्यानंतर राशी परिवर्तन होते. याप्रकारे ते पूर्ण एक वर्ष म्हणजेच १२ महिन्यांत १२ राशीमध्ये प्रवेश करतात. ज्योतिष शास्त्रात सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते आणि त्याचमुळे जेव्हा सूर्य राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. आज १६ डिसेंबर २०२३ रोजी सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करुन ‘विपरित राजयोग’ निर्माण करत आहेत. दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी सूर्याचे होणारे हे परिवर्तन आणि या राजयोगाचा काही राशींसाठी मोठा लाभदायक काळ सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही राशींना आजपासून सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. त्यांना बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

कोणत्या राशींना मिळणार बक्कळ पैसा?

मेष राशी

तुमच्या राशीतील नवव्या भावात विपरित राजयोग बनल्याने तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात. उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. घरात काही कौटुंबिक वाद असल्यास ते संपुष्टात येण्याची शक्यता आहे.  समाजात मान सन्मान वाढणार असून नाव आणि कीर्ती वाढण्याची शक्यता आहे. 

(हे ही वाचा: वर्षाच्या अखेरीस ‘गजकेसरी योग’ आणि ‘गुरु पुष्य योग’ बनल्याने ‘या’ राशी २०२४ मध्ये होतील श्रीमंत? देवगुरु देऊ शकतात प्रचंड धन )

तूळ राशी

या लोकांचं नशीब सूर्यासारखे चमकण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात आता आनंदच आनंद येऊ शकतो. उत्पन्नाचे नवं स्त्रोत तुम्हाला सापडू शकतात. नोकरदार लोकांनाही कार्यक्षेत्रात अनेक फायदे मिळू शकतात. वडिलोपार्जित व्यवसायातून तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळू शकते. लव्हलाइफमध्ये आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही कर्ज आणि आजारपणापासून मुक्त होऊ शकता. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे.

मकर राशी

विपरित राजयोग मकर राशीतील लोकांसाठी शुभ ठरु शकतो. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे प्रत्येक क्षणाला संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार असून तुमच्याबद्दल आदर वाढू शकते. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. बेरोजगारांना नोकरीची संधी लाभू शकते. नवीन योजनांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतो. मालमत्ता खरेदीचे योग बनू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)