Surya Gochar: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेव साधारणपणे दर महिन्याला एकदा राशी बदलतात. जेव्हा सूर्यदेव गोचर करतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम माणसाच्या जीवनावर आणि सर्व राशींवर होतो.

आता नोव्हेंबर महिन्यात सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. या बदलामुळे ३ राशींच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यांना पद आणि प्रतिष्ठाही मिळू शकते. तसेच अडकलेले पैसेही मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

सिंह राशि (Leo Zodiac)

सूर्यदेवांचं गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण सूर्यदेव तुमच्या राशीपासून पंचम स्थानी भ्रमण करतील. त्यामुळे या काळात तुम्हाला अपत्यसंततीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच प्रेमसंबंधांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात परदेशात व्यापार करणाऱ्या लोकांना विविध व्यवहारांमधून चांगला नफा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी एखाद्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल. मनात आत्मविश्वास वाढेल. तसेच जीवनसाथीचा पाठिंबा आणि मित्रांकडून शुभ वार्ता मिळू शकते.

मकर राशी (Capricorn Zodiac)

तुमच्यासाठी सूर्यदेवांचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो. कारण सूर्य तुमच्या राशीपासून ११व्या स्थानी भ्रमण करणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुख आणि शांतता मिळेल. या काळात गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. हा काळ आत्मविश्वास, यश आणि धैर्य वाढवणारा असेल. तुम्हाला एखादं मोठं काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. तसेच नवी नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरीमधूनही लाभ मिळू शकतो.

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

सूर्यदेवांचा गोचर तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकतो. कारण सूर्यदेव तुमच्या गोचर कुंडलीतील लग्न भावात भ्रमण करणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल आणि तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. जे लोक नातेसंबंधात आहेत, त्यांचे संबंध पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी लग्नाची बोलणी येऊ शकतात. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच जुनी गुंतवणूक किंवा व्यवसायातील प्रयत्नांमधून अनपेक्षित फायदा मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात प्रतिष्ठा आणि आदर वाढेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)