Surya Nakshatra Gochar in Rohini 2025: ज्योतिषशास्त्रानुसार सर्व नवग्रह राशींप्रमाणे नक्षत्र परिवर्तन करत असतात. राशीनुसार ग्रहांचे नक्षत्रात होणारे गोचरही मानवी जीवनावर प्रभाव करणारे ठरत असते. एखाद्या व्यक्तीचा कोणत्या नक्षत्रावर जन्म झाला आहे, त्यावरूनही काही गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नक्षत्र गोचर करत आहे. वैदिक पंचांगानुसार, २५ मे २०२५ रोजी सूर्य ग्रह चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याच्या नक्षत्रातील या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. परंतु काही राशींना मोठे नुकसान होऊ शकते, कोणत्या आहेत त्या राशी? जाणून घ्या…
मिथुन (Gemini)
सूर्याच्या नक्षत्रातील बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी फार कठीण असू शकतो. तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच, तुमच्या नोकरीच्या संदर्भात हा काळ आव्हानात्मक असू शकतो. रागावर नियंत्रण ठेवावं नाहीतर नाती बिघडू शकतात. आर्थिक चणचण भासू शकते. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव जाणवू शकतो. काही जुने आजार उद्भवू शकतात. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. या काळात सामाजिक जीवनातही काही अडथळे येऊ शकतात.
तूळ (Libra)
सूर्याचं नक्षत्र गोचराचा नकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तींवर पडण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायातही काही नुकसान होऊ शकते. तुमच्या घरात काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या हातातून अनेक कामे निसटण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत देखील तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. त्यामुळे मानसिक ताण येईल आणि नको त्या खर्चात पडाल. विद्यार्थ्यांच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रेम जीवनातही वाद होऊ शकतात.
कुंभ (Aquarius)
सूर्याचं रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश होताच कुंभ राशीच्या लोकांच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती कोलमडू शकते. या राशीच्या लोकांना आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकते. सरकारी कामातही कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे येऊ शकतात. एकामागोमाग एक तुम्हाला संकटांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. या काळात नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. कोणतेही प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)