scorecardresearch

येणारे ४० दिवस ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरतील फायदेशीर; मंगळाच्या संक्रमणामुळे होतील आर्थिक लाभ

१७ मे २०२२, मंगळवार रोजी मंगळ ग्रह कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करेल आणि २७ जूनपर्यंत मीन राशीत राहील.

मंगळ गुरु योगाचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे जाणून घेऊया. (File Photo)

ज्योतिषशास्त्रानुसार, १७ मे २०२२, मंगळवार रोजी मंगळ ग्रह कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करेल आणि २७ जूनपर्यंत मीन राशीत राहील. मंगळाचे हे संक्रमण अनेक राशींसाठी खूप फलदायी ठरणार आहे. गुरु आधीच मीन राशीत विराजमान आहे. परिणामी मंगळाच्या या संयोगाने मंगळ गुरु योग तयार होईल. या संयोगाचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे जाणून घेऊया.

वृषभ :

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या अकराव्या स्थानात मंगळाचे संक्रमण होणार आहे. गुरु येथे आधीच विराजमान आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि भविष्यातील योजनांमधून लाभ मिळतील. व्यापार्‍यांना त्यांच्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचा त्रास होऊ शकतो.

अपार संपत्ती मिळवण्यासाठी ‘ही’ ३ रत्ने आहेत खूपच फायदेशीर; जाणून घ्या कोण करू शकतात धारण

मिथुन :

मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील हे संक्रमण शुभ राहील. मंगळ त्यांच्या दशम भागात प्रवेश करणार आहे आणि गुरु ग्रह आधीच येथे उपस्थित आहे. यानिमित्ताने येथे मंगल गुरु योग तयार होत आहे. या राशीच्या लोकांसाठी हे अत्यंत खूप शुभ राहील. या काळात कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा आणि वर्चस्व वाढेल. एवढेच नाही तर या काळात जमीन, इमारत इत्यादी खरेदी होण्याची शक्यता आहे. या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळावे तसेच, रागावर नियंत्रण ठेवावे.

कर्क :

या राशीच्या लोकांसाठीही हा संयोग विशेष फलदायी ठरेल. या दरम्यान तुम्हाला मनःशांती जाणवेल. नोकरी आणि व्यवसायात वर्चस्व राहील. हा काळ उत्साही राहील. कठोर परिश्रम कराल, त्याचे फळ सकारात्मक असेल. या काळात विरोधकांपासून सावध राहावे लागेल. धार्मिक प्रवासाला जाता येईल.

तूळ :

या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण संमिश्र ठरेल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता राहील. नशिबाने आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कला क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा होईल. या काळात कोणतेही चुकीचे काम करणे टाळा. अन्यथा कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील. वाहन चालवताना काळजी घ्या.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The next 40 days will be beneficial for people of this zodiac sign the transition of mars will bring financial benefits pvp

ताज्या बातम्या