Thursday 15th February Horoscope Marathi: आज १५ फेब्रुवारी, गुरुवार, काही महिलांना मान-सन्मान मिळू शकतो. तर काही राशींना आर्थिक फायदा होऊ शकतो. आज तुमचा दिवस कसा असेल ते पाहा.

मेष:-सर्वांना आनंदाने वागवाल. व्यापार्‍यांना चांगला धनलाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. स्त्रीसमूहात वावराल. दिवस आळसात जाईल.

वृषभ:-कामात वारंवार बदल करू नयेत. सामाजिक वजन वाढेल. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा. व्यापारीवर्ग खुश राहील. वडीलधार्‍यांना नाराज करू नये.

मिथुन:-धार्मिक कामात हातभार लावाल. तुमची लोकप्रियता वाढेल. शैक्षणिक कामे मार्गी लागतील. सामाजिक सेवेची इच्छा दर्शवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

कर्क:-अचानक धनलाभ संभवतो. कामे कमी श्रमात पार पडतील. काही गोष्टी तडकाफडकी घडतील. जुन्या दुखण्यांकडे लक्ष द्यावे. फार विचार करू नये.

सिंह:-कौटुंबिक सौख्य जपावे. जोडीदाराची चांगली साथ राहील. पत्नीच्या प्रेमळपणाची जाणीव होईल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. एकमेकांना समजून घ्याल.

हेही वाचा : Chanakya Niti: नवरा-बायकोमधील ‘या’ ३ कारणांमुळे वाढतो दूरावा; सुखी वैवाहिक जीवनासाठी ‘ही’ सूत्रं नोट करा

कन्या:-क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. परिस्थितीला नावे ठेवू नका. किरकोळ गोष्टीं नजरेआड कराव्यात. मानसिक चंचलता जाणवेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

तूळ:-सर्व बाबी नीट समजून घ्याल. तरलतेने वागाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्व‍च्छंदीपणे वागाल. विचारांना योग्य दिशा द्याल.

वृश्चिक:-उत्तम वाहन सौख्य लाभेल. महिलांना कर्तेपणाचा मान मिळेल. घराची स्वच्छता काढली जाईल. उत्तम गृहसौख्य लाभेल. दिवस मजेत घालवाल.

धनू:-भावंडांशी सलोखा वाढेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवनवीन गोष्टी जाणून घ्याल. हातातील कलेत वेळ व्यतीत कराल. आवडते वाद्य वाजवाल.

मकर:-गायन कलेचे कौतुक केले जाईल. व्यापारी वर्ग खुश राहील. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. आवडीचे पदार्थ चाखाल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

कुंभ:-सर्वांना आपलेसे कराल. वागण्यातून सज्जनपणा दर्शवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. दिवस आनंदात जाईल. कला जोपासायला वेळ काढाल.

मीन:-मानसिक चंचलता जाणवेल. चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. उघडपणे बोलणे टाळाल. विचारात वाहून जाऊ नका. अधिकार्‍यांची गाठ घ्याल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर