Tirgrahi Yog in Mithun: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप महत्वपूर्ण मानले जाते. ग्रहांचे ठराविक वेळेनंतरचे राशी परिवर्तन त्रिग्रही, चतुर्ग्रही योग निर्माण करतात, ज्याचा १२ राशींच्या व्यक्तींवर विशेष परिणाम पाहायला मिळतो. जूनमध्ये बुध, सूर्य आणि गुरू ग्रह मिथुन राशीत त्रिग्रही योग निर्माण करणार आहे. गुरू सध्या वृषभ राशीत असून ६ जून रोजी बुध देखील या राशीत प्रवेश करेल तर सूर्य ग्रह १५ जून रोजी या राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत या तीन ग्रहांच्या एकत्र येण्याने त्याचा फायदा १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर परिणाम पाहायला मिळेल.
‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
वृषभ (Vrushabh Rashi)
त्रिग्रही योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल.
मीन (Meen Rashi)
त्रिग्रही योग मीन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)