Daily horoscope, 28 October 2024 : आज २८ ऑक्टोबर रोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी सोमवारी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होईल. तसेच आज इंद्र योग जुळून येईल आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दुपारी ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे.

याशिवाय सोमवारी गोवत्स द्वादशी व्रतही पाळण्यात येणार आहे. दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असून त्याची सुरुवात वसुबारसच्या सणाने होते. तर आज २८ ऑक्टोबरला वसुबारसचा सण साजरा केला जाणार आहे. वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ असे देखील म्हणतात.

Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य

त्याचप्रमाणे आज रमा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी म्हणतात. कुटुंबात सुख,, समृद्धी, प्रेम टिकून राहावे या इच्छेने हे व्रत पाळले जातात. या दिवशी भगवान विष्णू, महालक्ष्मी, भगवान श्रीकृष्णाचीही विशेष पूजा करावी लागते. तर आजचा शुभ दिन कोणाच्या आयुष्यात बदल घडवणार हे आपण जाणून घेऊया…

२८ ऑक्टोबर पंचाग व राशिभविष्य (Astrological prediction for all zodiac signs) :

मेष:- आजचा दिवस तुमच्यासाठी विचारशील असेल. कर्ज घेण्याचा विचार आत्ता करू नका. आज मित्रांची साथ मिळेल. पत्नीच्या बाजूने चांगली साथ मिळेल. आज नशीबाची चांगली साथ मिळेल.

वृषभ:- आजचा दिवस व्यस्त असेल. महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकाल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. आज समारंभासाठी आमंत्रण येईल. आज धावपळीमुळे थकवा जाणवेल.

मिथुन:- अनावश्यक खर्च केला जाईल. सामाजिक कामात अडथळा येऊ शकतो. देवावरील विश्वास दृढ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.

कर्क:- आजचा दिवस चांगला जाईल. मेहनतीचे गोड मिळेल. मुलांवरील विश्वास दृढ होईल. दिखाव्यासाठी पैसे खर्च कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल.

सिंह:- आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. बोलण्यात गोडवा असावा. डोळ्यांशी निगडीत अडचण दूर होईल. इतरांशी असणारे संबंध जपावेत.

कन्या:- आजचा दिवस सुखद असेल. हातातील कामे न डगमगता कराल. वडीलांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लोक तुमच्याविषयी गैरसमज करून घेऊ शकतात.

तूळ:- आजचा दिवस शुभ असेल. तुम्हाला मनाजोगी फळे मिळतील. नात्यात गोडवा निर्माण होईल. इतरांच्या आनंदाचा विचार कराल. सांपत्तिक स्थिती सुधारेल.

वृश्चिक:- मन काही कारणाने व्याकूळ होऊ शकते. व्यावसायिक प्रश्न सोडवता येतील. हितशत्रूंवर जय मिळवाल. संयमाने सर्व गोष्टी साध्य करता येतील. अडकलेली कार्यालयीन कामे पूर्ण होतील.

धनू:- दिवस चांगला जाईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. आवड जोपासता येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटाचे विकार जाणवतील. आहारवर संयम ठेवा.

मकर:- मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नावडते लोक सामोरे येतील. नातेवाईक तुमचा आदर करतील. सहकारी तुमच्या मताशी सहमत होतील. नवीन कामात गुंतवणूक कराल.

कुंभ:- नशीबाची साथ मिळेल. केलेला खर्च फायदेशीर ठरेल. कोणावरही अति विश्वास ठेवू नका. नोकरांचे सुखं लाभेल. जवळचा प्रवास घडेल.

मीन:- मुलांशी मतभेद संभवतात. आनंदी लोकांचा सहवास लाभेल. वाहवत जाऊ नका. सामाजिक सन्मानात वाढ होईल. तुमचे मनोबल वाढेल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )