Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेच अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते. तसेच, वटपोर्णिमा, गुढीपाढवा, दिवाळी, दसरा, लक्ष्मीपूजन, अशा विविध सणांच आणि शुभ मुहूर्ताची माहिती देखील दिली जाते.

Live Updates

Today's Horoscope Live 10 June 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह १० जून २०२५:

17:53 (IST) 10 Jun 2025

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

इतरांचा विश्वास संपादन करावा. अती व्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

17:29 (IST) 10 Jun 2025

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. वाट विकार बळावू शकतात. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.

16:22 (IST) 10 Jun 2025

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अती विचार करण्यात वेळ वाया जाईल.

15:20 (IST) 10 Jun 2025

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. रेस, जुगार यांतून नुकसान संभवते. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

14:07 (IST) 10 Jun 2025

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

13:29 (IST) 10 Jun 2025

मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

12:15 (IST) 10 Jun 2025

४८ तासांनी 'या' राशींचे भाग्य रातोरात पालटणार? देवगुरुच्या अस्तामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार? गुरुची कृपा कुणावर होणार?

Guru Asta 2025: गुरु अस्तामुळे काही राशींच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. पाहा तुमची रास आहे का यात... ...सविस्तर वाचा
12:15 (IST) 10 Jun 2025

उद्यापासून 'या' राशींच्या आयुष्यात येणार टर्निंग पाईंट, मिळणार बक्कळ पैसा? बुधदेवाचा उदय होताच देवी लक्ष्मी येईल तुमच्या दारी

Budh Uday 2025: बुध देवाच्या उदयाने कोणत्या राशींच्या भाग्याचे दार उघडण्याची शक्यता आहे. जाणून घ्या... ...अधिक वाचा
10:50 (IST) 10 Jun 2025

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर

Happy Vat Savitri Purnima 2025 Wishes : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास मराठीतून शुभेच्छा ...अधिक वाचा
10:47 (IST) 10 Jun 2025

पैसाच पैसा; मिथुन राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, 'या' तीन राशींना होणार अचानक धनलाभ

Budhaditya Rajyog: पंचांगानुसार, १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार असून ६ जून रोजी बुधदेखील याच राशीत प्रवेश केला आहे ...सविस्तर वाचा
09:59 (IST) 10 Jun 2025

First Vat Purnima Vrat: लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे का? वटपौर्णिमेच्या पूजनासाठी नेमकं साहित्य काय लागतं? वाचा ही’ यादी

Vat Purnima 2025 : लग्नानंतरची ज्यांची पहिली वटपौर्णिमा असणार आहे; त्यांच्यासाठी हा दिवस आणखीन खास असणार आहे. ज ...सविस्तर बातमी
09:28 (IST) 10 Jun 2025

Rashi Bhavishya: वटपौर्णिमेला ‘या’ रूपात घरी येईल लक्ष्मी; आर्थिक, वैवाहिक जीवनात येईल सुख? वाचा १२ राशींचे राशिभविष्य

Vat Purnima Special Horoscope In Marathi, 10 June 2025 :तर आज वटपौर्णिमेच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या भाग्यात काय घडणार जाणून घेऊया... ...सविस्तर वाचा
07:57 (IST) 10 Jun 2025

वटपौर्णिमेला “हा” मुहूर्त अजिबात चुकवू नका; कशी केली जाते वडाची पूजा? वाचा, कोणत्या राशीसाठी कसा जाईल आजचा दिवस?

Vat Savitri Purnima 2025 Date Puja Timing: ज्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात, तो वटपौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदा हा सण १० जूनला साजरा केला जाणार आहे. हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केलं जातं. सविस्तर वाचा...

20:21 (IST) 9 Jun 2025

First Vat Purnima Vrat: लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे का? वटपौर्णिमेच्या पूजनासाठी नेमकं साहित्य काय लागतं? वाचा ही’ यादी

Newly Married Women First Vat Purnima : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. वटपौर्णिमेचे व्रत केल्याने विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचे वरदान लाभू शकते अशीही मान्यता आहे. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. तर यंदा १० जून २०२५ ला म्हणजेच उद्या वटपौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे. तसेच लग्नानंतरची ज्यांची पहिली वटपौर्णिमा असणार आहे; त्यांच्यासाठी हा दिवस आणखीन खास असणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्रत (Vat Purnima 2025 ) ठेवणार असाल, तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. वाचा सविस्तर