Diwali Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलतात आणि नक्षत्रही बदलतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि पृथ्वीवर होतो.

शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी धनदेवता शुक्र ग्रह हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्राचे स्वामी चंद्र आहेत. अशा वेळी शुक्र ग्रहाच्या या बदलामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. या राशींना भरपूर पैसा, मान-सन्मान आणि पद मिळू शकते. चला तर मग पाहू या, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

कर्क राशी (Cancer Horoscope)

तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल फायद्याचा ठरू शकतो. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. तुम्हाला पैशाचा फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामात प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंद आणि एकता वाढेल. घरात शुभ प्रसंग किंवा मंगलकार्य होऊ शकते. आप्तांसोबतचे संबंध अधिक गोड होतील. या काळात पैसा गुंतवणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून लाभ आणि उत्पन्नाच्या ठिकाणी आहेत.
म्हणून या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या कामात फायदा मिळेल. खानपान आणि कपड्यांच्या व्यवसायात असलेल्या लोकांनाही लाभ होईल. मीडिया आणि चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्यांचे काम चांगले चालेल. या काळात केलेला पैसा गुंतवणाही फायदेशीर ठरेल.

मीन राशी (Pisces Horoscope)

तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून सातव्या भावात जात आहेत. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराला प्रगतीची संधी मिळू शकते. विवाहित लोकांना अपत्य सुख मिळण्याची शक्यता आहे. जे लोक घर, वाहन किंवा मालमत्ता घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय योग्य आहे. जीवनात स्थैर्य आणि संतुलन जाणवेल. या काळात तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. पार्टनरशिपच्या कामातही तुम्हाला फायदा मिळू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)