Horoscope Highlight’s : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.

Live Updates

Daily Horoscope Highlight's  In Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह ७ मे २०२५

16:49 (IST) 7 May 2025

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा वेग वाढवता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल.

16:49 (IST) 7 May 2025

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनात गैरसमजाला थारा देऊ नका.

16:15 (IST) 7 May 2025

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी वाद संभवतात.

15:05 (IST) 7 May 2025

गुरु आणि चंद्राची युतीमुळे निर्माण होणार 'गजकेसरी राजयोग'; या ३ राशीच्या लोकांचा होईल भाग्योदय, धनलाभाची मिळेल संधी

प्रत्येक राशीमध्ये कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी त्याची युती होते आणि शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. ज्याचा १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम होत असतो. ...सविस्तर वाचा
15:02 (IST) 7 May 2025

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील अरसिकता काढून टाकावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. मानसिक ताण ध्यानधारणा करून दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार हट्टीपणा करू नका.

14:51 (IST) 7 May 2025

१२ वर्षांनंतर बुधच्या राशीमध्ये निर्माण होईल शक्तिशाली गुरु आदित्य राजयोग; या राशींचे नशीब चमकणार, आकस्मिक धनलाभाचा योग

Sun And Jupiter Conjunction 2025 : ज्योतिष शास्त्रनुसार, गुरु आणि सूर्य मिथून राशींमध्ये युतीमध्ये गुरु आदित्य राजयोग निर्माण होत आहे ज्यामुळे ३ राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. ...सविस्तर वाचा
13:17 (IST) 7 May 2025

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

मनातील नैराश्य दूर सारावेत. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येवू शकते. कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल.

13:07 (IST) 7 May 2025

Chanakya Niti : यशस्वी व्यक्तींना कोणत्या चांगल्या सात सवयी असतात? वाचा, चाणक्य काय सांगतात…

Chanakya Niti : यशस्वी व्यक्तीमध्ये ७ सवयी असतात. आचार्य चाणक्य सांगतात की व्यक्तीने जीवनात या ७ गोष्टी अंगिकारल्या तर त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही ...वाचा सविस्तर
11:28 (IST) 7 May 2025

खूप सोसलं, आता होणार चांगभलं! आजपासून 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात बुधदेव करणार चमत्कार? अपार धनलाभाचे योग

Budh Gochar 2025: ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने आज मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींना जीवनात सुख-समृध्दी आणि अपार यश लाभू शकतो... ...वाचा सविस्तर
10:22 (IST) 7 May 2025
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

09:45 (IST) 7 May 2025

पुढील ७ दिवसानंतर मिळणार पैसाच पैसा! सूर्याचा दैत्यगुरूच्या राशीतील प्रवेश 'या' तीन राशींना देणार बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ

Sun Enter In Vrishabha Rashi: पंचागानुसार, सध्या मीन राशीत असलेला सूर्य तो १४ एप्रिल रोजी मंगळाच्या मेष राशीत त्यानंतर १५ मे रोजी शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या वृषभ राशीतील प्रवेशाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. ...वाचा सविस्तर
09:10 (IST) 7 May 2025

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल.

08:38 (IST) 7 May 2025

१२ वर्षांनंतर बुध-गुरूचा दुर्मीळ संयोग; मीनसह 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; प्रसिद्धी अन् ऐश्वर्याचे सुख

Guru Budh Sanyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि गुरू ग्रहाच्या दुर्मीळ संयोगाने १२ पैकी चार राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकते. ...सविस्तर वाचा
07:56 (IST) 7 May 2025

Daily Horoscope : मेष ते मीन राशीत रवी योगामुळे होणार मोठे बदल; कोणाला अचानक धनलाभ तर कोणाला घ्यावे लागणार साहसी निर्णय; वाचा तुमचे राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi, 7 May 2025: तर मेष ते मीन राशींच्या नशिबात नेमकं आज काय लिहून ठेवलंय हे पाहूया... ...सविस्तर वाचा

Today Horoscope 7 May 2025

Today Horoscope 7 May 2025