Weekly Numerology Predictions 25 To 31 August 2025: ऑगस्ट महिन्याचा हा आठवडा अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ शकतो. या आठवड्यात बुध सिंह राशीत प्रवेश करेल. या आठवड्यात काही मूलांकांच्या लोकांना भाग्य लाभू शकते. कुटुंबासह चांगला वेळ घालवल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. मूलांक १ ते मूलांक ९ पर्यंत लोकांचे अंकशास्त्रानुसार साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

मूलांक १ ( कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ तारखेला जन्मलेले लोक लोक)

या आठवड्यात सामाजिक कार्यक्रमांत व्यस्तता राहील. नवे संपर्क, नवे संबंध प्रस्थापित होतील. एकटेपणा दूर होईल आणि योग्य जीवनसाथी भेटू शकतो. जर तुम्ही नव्या संस्कृती व विचारांसाठी खुले असाल, तर मौल्यवान ज्ञान मिळेल. आठवड्याच्या शेवटी अचानक पाहुणे येऊ शकतात. प्रवासासंबंधी कामे पूर्ण होतील. कुटुंबासह छोटी सहल होऊ शकते.

मूलांक २ ( कोणत्याही महिन्याच्या२, ११, २०, २९ तारखेला जन्मलेले लोक)

या आठवड्यात समजावून सांगण्याची क्षमता विशेष ठरेल. कामाच्या ठिकाणी आणि घरी दडपण राहू शकते, ज्यामुळे चिडचिड होऊ शकते. मित्र आणि जीवन साथी आनंद देतील. गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक आहे. मुलांना शाळेच्या प्रकल्पात मदत करावी लागेल. सामाजिक संस्थांना मदत करणे शुभ ठरेल.

मूलांक ३ ( कोणत्याही महिन्याच्या३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेले लोक)

एखादी महिला मैत्रीण भावनिक फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. कार्यक्षेत्रात घेतलेले कठोर निर्णय विरोधास सामोरे जाऊ शकतात, पण शेवटी त्यातून चांगले परिणाम मिळतील. तुमची सर्जनशीलता पुढे येईल आणि लोकप्रियता वाढेल. व्यक्तिमत्व आणि आकर्षण वाढेल. मित्र वैयक्तिक समस्या सोडविण्यास मदत करतील. आठवड्याच्या शेवटी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून आशीर्वाद लाभेल. इतरांच्या गोष्टींमध्ये जास्त हस्तक्षेप केल्यास टीका होऊ शकते.

मूलांक ४ ( कोणत्याही महिन्याच्या४, १३, २२, ३१ तारखेला जन्मलेले लोक)

आजारी मित्राला भेटायला विसरू नका. या आठवड्यात प्रेम व रोमॅन्स आयुष्यात राहील. प्रिय व्यक्तीला आनंदी करण्यासाठी प्रयत्न कराल. प्रलंबित प्रस्ताव पूर्ण होतील. मोठे व्यावसायिक करार धन आणि प्रभावाच्या आधारे होतील. आवडीचे छंद पूर्ण करा. तुमची ऊर्जा आणि दृष्टिकोनामुळे विरुद्ध लिंगाच्या लोकांमध्ये लोकप्रियता वाढेल.

मूलांक ५ ( कोणत्याही महिन्याच्या५, १४, २३ तारखेला जन्मलेले लोक)

या आठवड्यात चांगली बातमी, नवी नोकरी किंवा नवे काम मिळेल. संघटनात्मक कामांमुळे प्रगती होईल. आपल्या कल्पना नीट मांडल्यास वरिष्ठांकडून मान्यता मिळेल. मुलं गोंधळलेली असू शकतात आणि तुमच्याकडे मार्गदर्शन मागतील. आरोग्याची काळजी घ्या, जास्त काम व उशिरापर्यंत जागरण टाळा.

मूलांक ६ ( कोणत्याही महिन्याच्या६, १५, २४ तारखेला जन्मलेले लोक)

या आठवड्यात कामात अडथळे येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. भावना पेक्षा बुद्धीला महत्त्व द्या. सावधगिरी बाळगल्यास गोष्टी आपल्या बाजूने होतील. विपरीत लिंगी एखादी व्यक्ती तुमच्या ताण कमी करण्यात मदत करेल. घरात काही धार्मिक कार्य होऊ शकते. परदेशी व्यवहार व प्रवासातून तत्काळ परिणाम मिळणार नाहीत.

मूलांक ७ ( कोणत्याही महिन्याच्या७, १६, २५ तारखेला जन्मलेले लोक)

महत्त्वाचे पत्रव्यवहार वेळेत पूर्ण करा. नवे प्रस्ताव येतील. व्यावसायिक सहकारी अडथळे आणू शकतात. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शहाणपणा आणि संयम गरजेचा आहे. आर्थिक अडचणी कमी होतील. घरात आनंद राहील. आठवड्याच्या शेवटी मित्रांबरोब छोटी सहल होऊ शकते.

मूलांक ८ ( कोणत्याही महिन्याच्या८, १७, २६ तारखेला जन्मलेले लोक)

या आठवड्यात अतिरिक्त पैसा कमावण्याचे नवे मार्ग शोधा. कल्पनाशक्ती वापरा आणि यशस्वी लोकांकडून शिका. स्वतःवर आणि मित्रांवर जास्त खर्च टाळा. कुटुंबाला प्राधान्य द्या. काहींना पुरस्कार वा भेट मिळू शकते. आरोग्याच्या काही समस्या त्रास देऊ शकतात. तुमच्या विविध आवडी व ज्ञानामुळे सामाजिक समारंभात आकर्षण वाढेल.

मूलांक ९ ( कोणत्याही महिन्याच्या९, १८, २७ तारखेला जन्मलेले लोक)

घाईघाईत बोलणे वा वागणे टाळा, अन्यथा मेहनतीचे नुकसान होईल. भावनिक परिस्थितींमध्ये मुत्सद्दीपणा गरजेचा आहे. कुटुंबासहच्या उपक्रमांत आनंद मिळेल. आजूबाजूच्या लोकांसाठी चांगले करण्याचे मार्ग शोधा. वैयक्तिक गरजा पूर्ण होतील. जीवनसाथीबरोबरचे संबंध घरात शांतता व सौहार्द आणतील. मुलं अभ्यासाऐवजी बाहेरील क्रियाकलापांत वेळ घालवतील. नवे विचार स्वीकारल्यास दीर्घकाळ टिकणारे संबंध जुळतील.