Kundali Predictions For Wedding Muhurta: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत वैवाहिक जीवन, आर्थिक लाभ, नोकरी/व्यवसायातील प्रगती व आरोग्य याविषयीची माहिती दडलेली असते. एखाद्याच्या वर्तमानात घडणाऱ्या गोष्टी भविष्यात कशा व कधी बदलतील याचे अंदाज सुद्धा कुंडलीच्या विश्लेषणावरून लावता येतात. आज आपण कुंडलीच्या अभ्यासावरून वैवाहिक आयुष्याबाबतचे अंदाज कसे वर्तवले जातात हे पाहणार आहोत. ज्योतिष अभ्यासक आदित्य गौर यांनी जनसत्तासाठी लिहिलेल्या लेखात याविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. तुमच्या कुंडलीतील सप्तम, सप्तमेश, नवमांश या स्थानी गुरु व शुक्राच्या प्रभावानुसार वैवाहिक आयुष्याची स्थिती ओळखता येऊ शकते. तुम्ही ती कशी ओळखू शकता हे आता आपण पाहूया..

कुंडलीवरून वैवाहिक आयुष्याचा अंदाज कसा लावतात?

१) जर एखाद्या व्यक्तीची लग्न रास कुंभ असेल आणि सूर्याच्या स्थानी शुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर अशा व्यक्तीला धनवान जोडीदार प्राप्त होतो असे म्हणतात. श्रीमंत घराण्यात अशा व्यक्तीचे लग्न होऊ शकते.

२) एखाद्याच्या कुंडलीतील सप्तम भावी वृषभ रास असेल व याच राशीत शुक्र किंवा चंद्र असेल तर त्यास सुंदर जोडीदार लाभू शकतो. या मंडळींच्या जोडीदाराचा स्वभाव लाघवी असतो व प्रत्येकाची काळजी घेण्याची त्यांना सवय असते.

३) एखाद्याच्या लग्न स्थानी व नवमांश स्थानी एकच ग्रह एकाच राशीत स्थिर असेल तर त्याला सर्वोच्च महत्त्व प्राप्त होते. यातून नेहमीच सकारात्मक फळ मिळू शकते. त्यातही जर हा ग्रह सूर्य म्हणजेच ग्रहांचा राजा असेल तर अशा मंडळींना लग्नानंतर प्रचंड मान-सन्मान व प्रतिष्ठा लाभू शकते.

४) जर एखाद्या व्यक्तीच्या नवमांश कुंडलीत अष्टम स्थानी पाप ग्रह (राहू- केतू) यांची दृष्टी असेल तर मात्र नात्यात अनेक भांडणे होण्याची शक्यता असते. पती-पत्नीचे लहान मोठ्या मुद्द्यांवरून सतत खटके उडू शकतात, ताळमेळ जमून येत नाही. अशावेळी अनेकदा घटस्फोटापर्यंत वाद पोहोचू शकतात.

५) एखाद्याच्या कुंडलीत सप्तम स्थानी जर शुभ ग्रहाचे स्वामित्व असेल व शुक्र त्यांच्या उच्च राशीत असेल किंवा स्वराशीतच प्रभावी असेल तर अशा मंडळींना लवकर लग्नाचे योग असतात. साधारण १८ ते २१ वयोगटातच त्यांचे लग्न जुळू शकते. ही मंडळी प्रचंड प्रामाणिक असतात.

६) एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सप्तम स्थानी राहू स्थित असेल तर वैवाहिक आयुष्य क्लेशकारक ठरू शकते. तसेच विवाहाचा योग सुद्धा उशिराने जुळून येतो.

हे ही वाचा<< Mangala Gauri Vrat 2024: श्रावणातील पहिली मंगळागौर कधी असणार? जाणून घ्या तारीख, तिथी आणि मंगळगौर साजरी करण्याचे महत्त्व

७) एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत सप्तम स्थानी शनीदेव असतील तर त्यांचे लग्न उशिराने होते तसेच थोडे ताण- तणावाचे आयुष्य जगावे लागते.

८) एखाद्याच्या जन्मकुंडलीत सातव्या स्थानी स्वराशीत किंवा उच्च राशीत मंगळ प्रभावी असेल तर अशी व्यक्ती थोडी भांडखोर, रागीट, हट्टी असते. साजेसा जोडीदार मिळाला नाहीतर लग्नांनंतर वाद होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)