Dhanteras Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची धनत्रयोदशी खूप खास आहे. कारण आजच्या धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्रवार आणि प्रदोष कालसह पाच शुभ योगांचा अप्रतिम योग जुळून आला आहे. आज कन्या राशीत चंद्र गोचरामुळे तीन ग्रहांची युती तयार होत आहे. कन्या राशीमध्ये शुक्र आणि चंद्र असल्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी धन योग तयार होत आहे, जो खूप लाभदायक मानला जातो. आज धन योगाबरोबर हस्त नक्षत्र आणि प्रीति योगही तयार होत आहे. अशा परिस्थितीत, या आश्चर्यकारक योगांच्या निर्मितीमुळे, काही राशींसाठी आजची धनत्रयोदशी खूप लाभदायक ठरू शकते. शिवाय या लोकांचे नशीब पालटू शकतं, त्यांना प्रचंड धनलाभ होऊ शकतो, तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

मेष रास

Surya Gochar 2024 in Bharani nakshatra
आता पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने पुढच्या १४ दिवसांत ‘या’ राशी होणार मालामाल
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?

आजचा धनत्रयोदशीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जात आहे. आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खरेदीसाठी खूप शुभ ठरु शकतो. आज तुम्हाला काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुमचे आरोग्य आणि व्यवसाय दोन्हीची स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आज धनत्रयोदशीचा दिवस शुभ मानला जात आहे. आज तयार होणाऱ्या योगामुळे तुमच्या आनंदात समृद्धीत वाढ होऊ शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व कार्यात यश मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांसाठी आज खरेदी करणं फायदेशीर ठरु शकतं.

हेही वाचा- दिवाळी संपताच ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? मालव्य राजयोग बनल्यामुळे अचानक धनलाभाची शक्यता 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरु शकतो. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर वाहने किंवा दागिन्यांची खरेदी तुमच्यासाठी शुभ ठरु शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा दिवस शुभ मानला जात आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)