Talking style: आपण कसे बोलतो यावरुन समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागणूक ठेवावी हे ठरवत असते. बोलण्यावरुन बऱ्याच गोष्टी ठरत असतात. एखाद्या व्यक्तीच्या राहणीमानाप्रमाणे त्यांच्या बोलण्यावरुनही त्याच्या स्वभावाची माहिती मिळवता येते. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचे अंग, त्यावरील रेखा, खुणा आणि बोलण्याची पद्धत यावरुन लोकांविषयी खूप काही सांगता येऊ शकते. प्रत्येकाची बोलण्याची शैली वेगळी असते. काहीजण स्पष्ट बोलतात, काही हळू आवाजात बोलतात. काहींना बोलताना अडखळतात. तर काही जणांना तोतरे बोलण्याची सवय असते. चला तर मग सामुद्रिक शास्त्राच्या मदतीने वेगवेगळ्या शैलीमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पटापट किंवा वेगाने बोलणारे –

सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखादी व्यक्ती न थांबता स्पष्टपणे पण वेगाने बोलत असेल, तर ती व्यक्ती शारीरिकरित्या निरोगी असावी असा अंदाज लावला जातो. अशा लोकांचे व्यक्तिमत्व हसमुख असते. पटापट बोलतानाही ते नेहमी सावधगिरी बाळगत असतात. ते फार प्रसन्न असतात आणि व्यवहारामध्येही फार तरबेज असतात.

अतिवेगाने बोलणारे –

काहीजणांना जोरात, वेगाने बोलायची सवय असते. असे लोक बिनधास्त असले तरी, ते बोलताना शर्यतीमध्ये धावत असल्याचा भास होतो. हे लोक फार उत्साही असतात. भांडणामध्ये सहभाग घेण्याची त्यांची इच्छा नसते. पण जर समोरुन कोणी भांडायला लागलं की ते त्याचा पिछा सोडत नाही. हे लोक कधीकधी चिडचिडपणा देखील करतात. मनमौजी हा शब्द अशा लोकांसाठी बनला आहे. हे लोक कधीही ताणाखाली नसतात.

आणखी वाचा – ‘लक्ष्मी नारायण योग’ तयार झाल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा

तोतरे (stammer) बोलणारे/ बोलताना अडखळणारे –

बोलताना अडखळणे, तोतरे बोलणे किंवा एखादा शब्द पुन्हा-पुन्हा म्हणत राहणे हे बुध ग्रहामुळे होत असल्याची शक्यता असते. अशा शैलीमध्ये बोलणाऱ्यांमध्ये कमी आत्मविश्वास असतो. ते छोट्या गोष्टींनी दु:खी होतात, नको त्या गोष्टी मनाला लावून घेतात. हे लोक मनाने फार चांगले असतात. त्यांच्या मनात सतत समोरच्या काय वाटेल असा विचार येत असतो. यामुळे त्यांचा गैरफायदा देखील घेतला जातो.

वजनदार आवाज असणारे –

भारदस्त आवाज असणाऱ्यांना दुसऱ्यांवर हुकूम सोडायला आवडतो. सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. जेव्हा कोणी त्यांना बोलताना मध्ये टोकतं, तेव्हा त्यांना लगेच राग येतो. वजनदार आवाज हे गुरु ग्रहाचा प्रभाव दर्शवतो.

आणखी वाचा – “उद्धव ठाकरेंची कुंडली सांगते की, २०२५ आधीच…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांची महत्त्वाची भविष्यवाणी

समोरची व्यक्ती बोलत असताना मध्येच टोकणारे –

बोलत असताना मध्येच कोणी थांबवत असेल किंवा बोलणं पूर्ण होऊ न देता स्वत: बोलायला सुरुवात करणारे लोक स्वभावाने जिद्दी, हट्टी असतात. त्यांच्याकडे खूप माहिती असते. त्यामुळे त्यांना बोलत राहायचे असते. त्यांना बोलू दिले नाही अथवा त्यांच्या मताला किंमत दिली नाही, तर ते लगेच नाराज होतात. सामुद्रिक शास्त्रानुसार, अस्पष्ट शब्दांमध्ये संवाद साधणारे लोक काहीसे बेजवाबदार असतात. या श्रेणीतील लोक सच्चे, प्रामाणिक आणि संवेदनशील असतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your talking style can indicate your personality according samudrik shastra yps
First published on: 01-03-2023 at 19:36 IST