07 July 2020

News Flash

राज्यात दीड लाख कोटींचे रस्ते उभारणार

राज्यात येत्या काळात दीड लाख कोटींचे रस्ते उभारण्याचा संकल्प केला आहे

मुंबईहून लंडनला माल पाठवणे स्वस्त आहे, पण दिल्लीला माल पाठवणे महाग असल्याचे उद्योजक सांगतात.

औरंगाबाद जिल्हय़ात १५ हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन
राज्यात येत्या काळात दीड लाख कोटींचे रस्ते उभारण्याचा संकल्प केला आहे, त्यासाठी ९५ लाख टन सिमेंट राखून ठेवले आहे. मी केवळ घोषणा करणारा मंत्री नाही, तर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर हवी ती शिक्षा भोगेन, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. औरंगाबाद येथे मराठवाडय़ातील १५ हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईहून लंडनला माल पाठवणे स्वस्त आहे, पण दिल्लीला माल पाठवणे महाग असल्याचे उद्योजक सांगतात. यावर उपाय म्हणून येत्या काळात जलमार्ग सुरू केले जाणार असून आत्तापर्यंत १११ नदीमार्ग पूर्ण केले जाणार आहे. पैकी ३६ जलमार्गाचा प्रकल्प आराखडाही तयार करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी निधीची कमतरता पडणार नाही, कारण जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसह वेगवेगळ्या पंधरा कंपन्या नफ्यात आहेत. शिवाय ४ हजार कोटी डॉलरचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून घेत आहे. त्यामुळे येत्या काळात एअरपोर्टसारखे वॉटर पोर्ट उभे करण्याचा प्रयत्न राहील.
ग्रामीण भागातील शेतमालाची निर्यात वाढावी म्हणून, जालना येथे उभारण्यात आलेल्या ड्रायपोर्टचा अधिक फायदा होईल असेही त्यांनी सांगितले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ४ हजार ४२ कोटी रुपयांची कामे केंद्रीय रस्ते निधीतून मंजूर केल्याबद्दल गडकरी यांचे आभार मानले. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, चंद्रकांत खैरे यांचीही समयोचित भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 3:04 am

Web Title: half lakh crore rupees will use for build roads in state
टॅग Nitin Gadkari
Next Stories
1 अपूर्ण सिंचन प्रकल्पातही कंत्राटदारांवर मेहेरनजर
2 मराठवाडय़ातून केंद्रीय अबकारी शुल्कात घसरणीची शक्यता
3 दुष्काळामुळे यंदाचा ‘लातूर फेस्टिव्हल’ रद्द
Just Now!
X