scorecardresearch

औरंगाबाद : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा

सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या विरोधात मित्राच्या पत्नीचा विनयभंग करण्यासह धमकावणे, बळेच घरात शिरणे, पीडितेच्या पतीसह दिराला मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा
सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा (लोकसत्ता टीम)

औरंगाबाद – औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या विरोधात मित्राच्या पत्नीचा विनयभंग करण्यासह धमकावणे, बळेच घरात शिरणे, पीडितेच्या पतीसह दिराला मारहाण करणे आदी कलमान्वये सिटी चौक पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लक्ष घालून विशाल ढुमेंविरोधात कारवाईची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची याप्रकरणात रविवारी भेट घेतली. विशाल ढुमे यांनी मात्र या प्रकरणातून आपली व पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश असून, बळेच आपल्याला गोवले जात असल्याचे “लोकसत्ता”शी बोलताना सांगितले.

हेही वाचा – औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ, राष्ट्रवादीकडून ‘जुने पेन्शन’ योजनाच प्रचाराच्या केंद्रस्थानी

विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला ही नारळीभाग परिसरात अभ्यासिका चालवते. ती पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर राहत असून शनिवारी रात्री कुटुंबासह सिडकोतील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. तेथे आधीच विशाल ढुमे हे त्यांच्या मित्रांसमवेत स्वतंत्रपणे एका कक्षात जेवण करत होते. विशाल ढुमे हे पतीचे मित्र असल्याने जेवणानंतर त्यांनी पोलीस आयुक्तालय परिसरात सोडण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांना आमच्या वाहनातून सोडण्यासाठी घेऊन जात होतो. यावेळी वाहन पती चालवत होते तर त्यांच्या बाजूला आपण मुलीसह बसलो असताना मागच्या बाजूला बसलेल्या विशाल ढुमेने विनयभंग केला. घराजवळ आले असताना स्वच्छतागृह वापरण्यासाठी बळेच घरात शिरले. सासूला धमकावले. पती व दीराला मारहाण केली. ११२ क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना पाचारण केले. पोलीस ढुमे यांना घेऊन गेले.

हेही वाचा –

दरम्यान चित्रा वाघ यांनी विशाल ढुमे यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केली. तूर्त ढुमे यांना नियंत्रक कक्षात हलवल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 16:11 IST

संबंधित बातम्या