छत्रपती संभाजीनगर – येथील कर्णपुरा देवीच्या परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त भरलेल्या यात्रेत एक २१ वर्षाचा तरूण सैन्य दलातील जवानासारखा पोशाख, बुट व टोपी घालून फिरताना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आले.

दामिनी पथकाने संबंधित जवानाला बाजूला घेऊन चौकशी केली असता त्याने, मी उत्तराखंडमधील बटालियनचा जवान आहे म्हणत नंतरची काही उत्तरे उडवा-उडवीची देत असल्याचे लक्षात येताच या प्रकरणी छावणी ठाण्यात पथकाकडून महिला पोलीस अनिता संपत शिंदे (वय ५७) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहु नामदेव राऊत (रा. सोमवाडी ता. पैठण), असे तोतया जवानाचे नाव आहे.

या प्रकरणी नोंदवलेल्या तक्रारीनुसार अनिता शिंदे या २३ सप्टेंबर रोजी दामिनी पथकात नेणुकीस होत्या. त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कांचन सचिन मिरघे, कल्पना खरात, सुनीता नागलोद, मोनीका दिवे, साक्षी चंद्रे, सुधाकर पवार, चालक बाळु वणे आदींचे पथक कर्णपुरा यात्रेत गस्त घालत असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास कर्णपुरा येथील तुळजाभवानी गाभारा मंदीर येथील बंदोबस्त प्रभारी अधिकारी पीलीस निरीक्षक प्रवीणा यादव, तसेच एम. वाळूज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आयुज हेही असताना त्यांना एक तरुण दिसला. त्याच्या पोशाखात इंडीयन आर्मी टि शर्ट, त्यावर “इंडियन आर्मी” असे लिहलेले जैकेट व इंडीयन आर्मीची टोपी, पैन्ट व पायात डि.एम.एस बूट होता. हा तरूण गाभा-यात गर्दीत घुसत असताना दिसल्याने त्यास बाजूला घेऊन चौकशी केली.

त्यावेळी पौलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तरुणास त्याचे नाव, गाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव लहु नामदेव राऊत तर व्यवसाय- आराधी (जागरण गोंधळ) असल्याचे सांगितले. लहू पैठणजवळील सोमवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर लहूकडे अधिकची विचारपूस केली असता, मी उत्तराखंड, ३७ बटालियनला सीएमपीमध्ये कार्यरत असून २०२३ च्या तुकडीमध्ये पुण्याजवळील खडकवासला येथे माझे प्रशिक्षण झाले असल्याचे सांगितल्याची माहिती असून, त्याबाबतचे ओळखपत्र अथवा इतर पुरावे मागितले असता, तो समाधानकारक उत्तरे देवु शकला नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव पोलिसांनी दिली.

कर्णपुरा यात्रेत तुळजाभवानी मंदीरात दर्शन घेण्यासाठी इंडीयन आर्मीचे गणवेश परीधान करुन सामान्य नागरीकांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी महिला, नंतर तृतीयपंथीय असल्याचा बनाव केला

लहू राऊत याच्या दोन्ही कानात डुल, अलंकार आहेत. तोंडावर मुखपट्टी व डोक्यावर टोपी घातल्याने तो स्त्री असल्यासारखे भासवून शिरला होता. त्याच्या विषयी संशय आला. चौकशीसाठी बाजूला घेतले असता त्याने आधी महिलाअसल्यारख्या आवाजात बोलण्याचा बनाव केला. पुन्हा आपण तृतीयपंथीय असल्याचे भासवले. पण पूर्ण चौकशीत पुरुष म्हणून उघड झाले. – प्रवीणा यादव, पोलीस निरीक्षक