धाराशिव : उस्मानाबाद धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता महाविकास आघाडीच्या वतीने “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” पक्षाचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, तसेच काँग्रेस आय पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार श्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहे.
हेही वाचा : नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
धाराशिव शहरातुन १६ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी १० वा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक येथुन महाविकास आघाडीच्या वतीने रॅलीस सुरवात होणार असुन ही रॅली धारासुर मर्दिनी मंदिर, हजरत खाजा शमशुद्दीन गाझी रहे , मुख्य रस्त्याने नेहरू चौक, माऊली चौक, काळा मारुती मंदिर , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर धाराशिव नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील मैदानावर आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुख यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, सर्व पदाधिकारी व शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडी व शिवसेना अंगीकृत सर्व संघटना यांनी स्वखर्चाने या रॅलीस व सभेस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.