औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ एसटी बस आणि पीकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झालेत.

औरंगाबाद-जालना रस्त्यावरील गाढे पिंपळगावजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस (एम. एच. १३ सी. यू. ६८३८) व पीकअप बोलेरो (एम. एच. २१ बी. एच. ४३३१) या वाहनांमध्ये बुधवारी (२५ मे) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. या अपघाताची नोंद करमाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र बोडके यांनी दिली.

Accident on Samriddhi highway in Sinnar taluka two dead three seriously
सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

अपघातातील मृतांमध्ये लहू ज्योतीराम राठोड (वय ५०, रा. रेणुकानगर, औरंगाबाद), अशोक जयसिंग चव्हाण, रणजित जयसिंग चव्हाण, शांतीलाल हरी चव्हाण (तिघेही रा. सातारा तांडा) व लता उर्फ पारूबाई ज्ञानेश्वर जाधव (रा. राजनगर बायपास, औरंगाबाद) यांचा समावेश आहे. विकास ढेरे व रोहित विकास ढेरे (दोघेही रा. गुरु लॉन्सच्या मागे, औरंगाबाद) हे दोघे जखमी झाले.

हेही वाचा : वाडा तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात चार ठार, पाच जण जखमी

मृतांमध्ये दोन भावांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोडके पथकासह दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत व जखमींना बाहेर काढले. उपचारासाठी जखमींना व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांनी भेट दिली. यावेळी करमाड ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे उपस्थित होते.