Marathwada Dairy Cattle Death in Flood: जून महिन्यापासून येणाऱ्या पूरात मराठवाड्यात २५३४ जनावरे दगावली. २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये २० सप्टेंबरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत फक्त सहा दिवसात ३५७ जनावरे दगावली. यामध्ये नव्या निकषानुसार दुधाळ मोठ्या जनावरांसाठी ३२ हजार, लहान जनावरांसाठी चार हजार अशी मदत देण्याबाबतचे निकष आहेत. परिणामी धाराशिव जिल्ह्या खवा निर्मितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या भागात आता चाराही नसल्याने शेतकरी हैराण आहेत.

जनावरांच्या मृत्यूमुळे अनेक शेतकरी हैराण आहेत. पुरात सर्वाधिक गायीची जोपासना करणारे शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांचा मुलगा म्हणाला, ‘ अचानक रात्रीतून पाणी वाढत गेले. घरातील मंडळी स्वत:चे जीव वाचवले. पण दारात उभ्या असणाऱ्या १७ जर्सी गायी दावणीला दगावल्या. १० गायी वाहून गेल्या. त्यांची १५ वासरंही पुरांनी वाहून नेली. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील विश्वनाथ आत्माराम दातखिळेचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. २७ गायी, वासरं सांभाळत दर महिन्याला एक लाख ८० हजार रुपयांचा दूध व्यवसाय करून संयुक्त कुटुंबाचा भार ओढणारा शेतकरी आता हतबल झाला आहे. कडबाकुट्टीचं यंत्र, धारा काढण्याचे दोन यंत्र सारं काही वाहून गेलं. शेतीमध्ये नुकसान तर झालंच. आता जगायचं कसं असा प्रश्न त्यांना सतावतो आहे.

भूम तालुक्यातील पिंपळगावमध्ये राहणाऱ्या विश्वनाथ यांना आता अनाथ झाल्यासारखं वाटत आहे. त्यांचा डी.फार्मसी झालेला मुलगा पुण्याहून परत आला. तो सांगत होता, काय करायचं तेच सुचत नाही. एक बाग वाहून गेली. धान्य भिजलं. सगळं सुख आणि समृद्धी पूर वाहून घेऊन गेला. चिंचपूरच्या दूध डेअरीला दररोज जाणारे दूध थांबले. दररोज २५० लिटरपर्यंचा व्यवहार पूर्णत: थांबला आहे. ३६ रुपयांपर्यंतचा दर मिळायचा. त्यामुळे रोख रक्कम हाती येत होती. विश्वनाथ यांची हतबलता पराकोटीची आहे.

याच गावाजवळ आहे चिंचपूर गाव. भूम तालुक्यातील या गावात दुधाचा व्यवसाय करणारे अनेकजण. अमोल ढगे यांनी सहा महिन्यांपूर्वी दूध डेअरीच्या ‘चेअरमन’ कडून पाच लाख रुपयांची उचल घेऊन १० गायी घेतल्या. त्यातील चार गायी वाहून गेल्या आणि पाच गायी दगावल्या. दररोज दीड हजार रुपयांचे दूध विक्री करणाऱ्या अमोलचे पाय आता खोल चिखलात रुतू लागला आहे. घरात खाणारी सहा तोंडे आहेत. पुराने जगण्याची हिम्मतच वाहून गेली. आता पुढे कसे होईल काय माहीत, असा त्याचे पुटपुटणे अनेक अनुत्तरीत प्रश्नांचं जाळं नवे संकटं तयार करणार या भागात खवा उत्पादन ३० प्रकल्प आहेत. एका प्रकल्पात ५०० किलो तयार होतो. तसेच ६०० भट्ट्या आहेत. जनावरांच्या मृत्यूमुळे तसेच चारा नसल्याने गेल्या २५ टक्के दूध उत्पादन घटले असल्याचे खवा उत्पादक विनोद जोगदंड यांनी सांगितले.

माजी आमदार राहुल मोटे म्हणाले, चाऱ्याचा प्रश्न मोठा आहे. पाऊस् थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुध उत्पादकांसमोर मोठी अडचण झाली आहे. या तालुक्यात सर्वाधिक दूध उत्पादन होते.