छत्रपती संभाजीनगर : केंद्र व राज्य सरकार लोकशाही मूल्यांवरच घाला घालत असल्याचा आरोप करत जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांची एकजूट ‘ वज्रमुठी तून दिसावी म्हणून आयोजित शहरातील मराठवाडा सांस्कृतिक सभेच्या वेळी भाजपनेही वीर सावरकर यात्रेचे आयोजन रविवारी सायंकाळी पाच वाजताच केले आहे. तुमची सभा तर आमची यात्रा असा डाव आणि प्रतिडाव शनिवारी रंगणार आहे. हे दोन्ही राजकीय कार्यक्रम दंगलीनंतर होत असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

शहरातील सावरकर पुतळयाला अभिवादन केल्यानंतर भाजपची यात्रा शहरातील संस्थान गणपतीपर्यंत जाणार असून त्यात शांतता राखली जाईल, असा दावा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केला. या़त्रे दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जरी सावरकर यांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यास आले तर त्यांचे स्वागत करू, असेही भुमरे म्हणाले.

 दरम्यान महाविकास आघाडीची सभा यशस्वी होईलच असा दावा केला जात आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील तयारीचा आढावा ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, अनिल परब, चंद्रकांत खैरे, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष् कल्याण काळे यांनी केली.

महाविकास आघाडीच्या सभेच्या वेळीच यात्राही काढली जाणार आहे. शहरात ठाकरे गटाचा मेळावा असला की शिवसेनाही मेळावा आयोजित करते अशी कार्यप्रणालीही गेल्या काही दिवसात विकसित झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दंगलीचा औद्योगिक विकासावर परिणाम नाही-देसाई

छत्रपती संभाजीनगर : सौहार्द नसेल, तर औद्योगिक गुंतवणुकीवर मोठा परिणाम होतो हे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकांचे मत माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खोडून काढत अशा छोटय़ा घटनांचा परिणाम होत नसतो, असे म्हटले आहे. यापूर्वीही या शहरात दंगली झाल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या शहराचा विकास झालाच, असा दावा करत या छोटय़ा घटनांचा गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. शहरातील वाळुज, शेंद्रा, तसेच ‘औरिक सिटी’मध्ये करण्यात आलेल्या सुविधा वाढल्या आहेत. तेथे गुंतवणूकही येत आहे. अशा घटनांमुळे त्यावर परिणाम होईल, असे वाटत नसल्याचे देसाई म्हणाले.