कोल्हापूर जिल्ह्यातील एका खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आनंद रामचंद्र गोसावी (वय ६०) या कैद्याने येथील घाटी रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या कैद्यास तोंडाचा कर्करोग होता. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्याला औरंगाबादच्या कारागृहात हलविण्यात आले होते. नोव्हेंबरपासून दर तीन-चार दिवसांनी त्याला रुग्णालयात आणावे लागत असे. रात्री दोनच्या सुमारास वॉर्ड क्रमांक दहाच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या गजाला गमछा बांधून त्याने गळफास घेतला.
कोल्हापूर येथील एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आनंद गोसावी याला नोव्हेंबरमध्ये औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहात वैद्यकीय कारणासाठी हलविण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. तोंडाचा कर्करोग असल्याने तो आजारपणाला वैतागला होता, असे सांगितले जाते. त्याचा आजारही बळावला होता. रात्री त्याने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. बेगमपुरा पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हय़ाची नोंद करण्यात आली. त्याची चौकशी केली जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापूरच्या कैद्याची औरंगाबादेत आत्महत्या
कोल्हापूर जिल्ह्यातील एका खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आनंद रामचंद्र गोसावी (वय ६०) या कैद्याने येथील घाटी रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या कैद्यास तोंडाचा कर्करोग होता.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-03-2016 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of prisoner in aurangabad