बीड : पंकजा मुंडेंनंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानामुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी समाजाच्या परळी बंद हाकेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तर बीडमध्ये सकल मराठा समाजही रस्त्यावर उतरला. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर एका तरुणाची आत्महत्या तर दुसऱ्याचा अकस्मात मृत्यू मृत्यू झाल्याची फिर्याद किनगाव ठाण्यात नोंदवण्यात आली.

पंकजा मुंडेंचे आवाहन

स्वत:च्या जीवाला धक्का तोच लावेल त्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे. तुम्हीही सकात्मकता दाखवा आणि संयमाने राहा. माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई-बापाला दु:खं देऊ नका, तुम्हाला शपथ आहे मुंडे साहेबांची, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी टोकाचे पाऊल उचलणाऱ्यांना समाजमाध्यमातून आवाहन केले.

हेही वाचा…बीडमधील ‘सर्पराज्ञी’त पक्षाघाताने घायाळ हरणीचे बाळंतपण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सकल मराठा’चे निवेदन

शिरूर कासारमधील बंददरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये रविवारी सकल मराठा समाज शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला. समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी मोठ्या संख्येने लोक असल्याने बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.