06 August 2020

News Flash

बबन मिंडे

तुळजापुरात उलाढाल मंदावली

यंदा दसऱ्याला तुळजापूरमधील व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. ऐन वेळी दर्शनरांगेत केलेले बदल, पावसाने ओढ दिल्याने भाविकांची संख्या लक्षणीय घटली.

शंभर पटींनी वाढवा साठे!

तूर डाळ महागली म्हणून राज्यभरात साठेबाजांवर धडाकेबाज कारवाईसत्र सुरू करणाऱ्या सरकारने आता मात्र व्यापाऱ्यांच्या साठा करण्याच्या क्षमतेलाच नव्या आदेशाने ‘शंभर पटींनी’ बळ दिले आहे!

जिल्हा बँक शाखेत ४५ लाखांचा अपहार

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येहळेगाव सोळंके शाखेत ४४ लाख ७७ हजार ७०३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

प्रदूषणाच्या सर्वच कसोटय़ांत औरंगाबादेतील उद्योग नापास!

प्रदूषणाच्या सर्व कसोटय़ांमध्ये औरंगाबादमधील उद्योग जवळपास नापास झाले आहेत.

डेंग्यूचा दुसरा बळी; लातूरकर धास्तावले

लातूर शहरात डेंग्यूचा उद्रेक वाढला असून मंगळवारी औसा रस्त्यावरील दुसरा बळी गेला. या पाश्र्वभूमीवर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘मलिदा खाण्यासाठी लोणीकरांची धडपड’

विरोधी पक्षात असताना ८ हजार ५०० रुपये भाव द्या म्हणणारे आताचे सत्ताधारी कापसाला ३ हजार ८०० भाव कसा काय देतात, असा सवाल करीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

कवी सोनकांबळे यांच्याकडून राज्य सरकारचा पुरस्कार परत

देशभरात सुरू असलेले पुरस्कार परतीचे लोण आता नांदेडपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील लोह्याचे साहित्यिक व कवी प्रभाकर सोनकांबळे यांनी राज्य सरकारच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार परत केला आहे.

शिवसेना महाराष्ट्राचे ‘लफडा सदन’ होऊ देणार नाही – खासदार राऊत

शिवसेना राजकारणात पातिव्रत्य व सौभाग्य जपत आली आहे. राजकारणात होणारे अफेअर सेना सहन करणार नाही व महाराष्ट्राचे लफडा सदन होऊ देणार नाही

परभणीमधील वनविभागाचे कार्यालय हिंगोलीला जाणार

एकापाठोपाठ एक अशी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये इतर जिल्ह्यात जात असताना आता वनविभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय िहगोलीत हलविण्याचा घाट घालण्यात आला आहे.

पाथरी तहसीलसमोर शेतकऱ्यांचे उपोषण

पाथरीतील रेणुका शुगर्सचा गळीत हंगाम सुरू करावा, या साठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

नांदेडच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर सशस्त्र हल्ला

सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या नागार्जुननगरमधील शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात काही समाजकंटकांनी रविवारी रात्री सशस्त्र हल्ला केला.

मावळातील कोथुर्णे गावात टोळक्याकडून दलित वस्तीवर हल्ला

पवनमावळातील कोथुर्णे गावात किरकोळ कारणातून सुमारे २५ ते ३० जणांच्या टोळक्याने गावातीलच दलित वस्तीवर हल्ला करत धुडगूस घातल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

पिंपरीत आरपीआय कार्यकर्त्यांकडून तोडफोड

फरीदाबाद येथे झालेले दलित हत्याकांड प्रकरण व त्यानंतर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री धुडगूस घातला.

रोटरी इंटरनॅशनल, ‘मिक्ता’तर्फे दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

राज्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल आणि मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अॅवॉर्ड अर्थात मिक्ता यांनी पुढाकार घेतला आहे.

प्रशासनाच्या कारवाईनंतर व्यापाऱ्यांची धावाधाव

विनापरवाना डाळींचा साठा केलेले व्यापारी आता प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. शुक्रवारी जुना मोंढय़ातील डाळ व्यापाऱ्याचे दुकान सील करण्यात आले.

नगरच्या पालखीत बसून तुळजाभवानीचे सीमोल्लंघन

आई राजा उदे उदेच्या जयघोषात कुंकवाची मुक्त उधळण करीत तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रातील दसऱ्याचे सीमोल्लंघन शुक्रवारी उत्साहात साजरे झाले.

जिल्ह्य़ात ५२ छाप्यांमध्ये कोठेही अवैध साठा नाही!

देशभर डाळींच्या दरवाढीचा मुद्दा गाजत असताना पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यात विविध ठिकाणी गोदामांवर तहसीलच्या पथकाने बुधवारी छापे टाकले.

पोहनेरला पाण्यावरून तरुणाचा निर्घृण खून

आदर्श संसद ग्रामसाठी निवड झालेल्या पोहनेर गावात पाण्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. विजयादशमीच्या दिवशी हा प्रकार घडला.

ऊसतोड मजुरांसाठी सत्तेचाही त्याग करू – पंकजा मुंडे

वेतनवाढीसाठी ऊस तोडणी मजुरांनी सुरू केलल्या संपाला पाठिंबा देतानाच या मागणीसाठी वेळ आल्यास आपण सत्तेचा त्याग करू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगडावर दिली.

सोलापुरात धम्मचक्र परिवर्तनदिनी शोभायात्रेस आंबेडकरप्रेमींचा प्रतिसाद

१९५६ साली दसऱ्याच्याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात दीक्षाभूमीवर बौध्द धर्माची दीक्षा घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेची स्मृती म्हणून धम्मचक्र परिवर्तनदिन गुरुवारी बौध्द धर्मियांसह आंबेडकरप्रेमी जनतेने उत्साहाने साजरा केला.

सांगलीच्या सराफा बाजारात सोन्याची लयलूट

दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी सांगलीच्या सराफा बाजारात सोन्याची ग्राहकांनी लयलूट केली.

अतिरिक्त डाळीचा साठा नसल्याचा निर्वाळा

जिल्ह्यात ७९ दुकानांवर छापे मारून कोणाकडेही अतिरिक्त डाळीचा साठा आढळून आला नसल्याचे पुरवठा शाखेने स्पष्ट केले.

सोलापुरात वाजत-गाजत मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची उत्साहात सांगता

गेले नऊ दिवस विविध व्रतवैकल्ये करून आदिशक्ती मातेची मंगलमय वातावरणात मनपूर्वक आराधना केल्यानंतर गुरूवारी विजयादशमीदिनी शक्तिदेवी मंडळांच्या सवाद्य मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता झाली.

मशिदीसाठी ‘विठ्ठला’चा हातभार

मतांच्या राजकारणासाठी समाजात दुहीचे बीज पेरणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कार्य उमरगा तालुक्यातील जकेकूर गावात मशिदीच्या बांधकामाच्या रूपाने उभे राहिले आहे.

Just Now!
X