Hyundai Exter India launch on July 10: टाटा पंच सध्या मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये अतिशय लोकप्रिय मॉडेल आहे. टाटा पंच लाँच होऊन जवळपास दीड वर्ष झाले असून आतापर्यंत सुमारे दोन लाख युनिट्सची विक्री झाली आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कारपैकी ही एक आहे. पण, आता Hyundai या सेगमेंटमध्ये स्वतःचे उत्पादन आणत आहे जे थेट टाटा पंचला आव्हान देईल. लवकरच Hyundai ची Exter बाजारात उपलब्ध होणार आहे. Hyundai Motor India १० जुलै रोजी त्यांच्या मायक्रो SUV- Exter च्या किमती जाहीर करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इतक्या’ रुपयांमध्ये करा बुकिंग

सर्व-नवीन Hyundai Exter ही कंपनीच्या श्रेणीतील सर्वात स्वस्त SUV असणार आहे आणि त्यासाठीची प्री-बुकिंग ११,००० रुपये टोकन रक्कम निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ११,००० रुपये भरून तुम्ही ही कार स्वतःची बनवू शकता.

(हे ही वाचा: टाटाचा मोठा धमाका! देशात दाखल केली दोन CNG सिलिंडर असलेली कार, किंमत उघड, बुटस्पेसही जबरदस्त )

इंजिन आणि पॉवर

Hyundai Exter ला पॉवर १.२-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे Grand i10 Nios आणि काही इतर Hyundai कारला देखील शक्ती देते. हे इंजिन ८२ bhp कमाल पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह AMT पर्याय देखील मिळतो. Hyundai Exter मध्ये देखील CNG चा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Exter ही पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV असेल जी सर्व प्रकारांमध्ये मानक म्हणून ६ एअरबॅग्ज मिळवते. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, यामध्ये ESC, वाहन स्थिरता व्यवस्थापन, हिल असिस्ट कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. ४० पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्ससह ही कार सादर होण्याची शक्यता आहे.

किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता

सर्व-नवीन Hyundai Exter EX, S, SX, SX(O) आणि SX(O) Connect ट्रिममध्ये ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे. Hyundai च्या श्रेणीतील ही सर्वात स्वस्त SUV असणार आहे. त्याची किंमत ६ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेत ही कार Hyundai Exter थेट Tata Punch, Citroen C3, Nissan Magnite सारख्या लोकप्रिय कारशी टक्कर देईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2023 hyundai exter b suv is going to launch on july 10 in india micro suv will be the first in the segment to get a dash cam a sunroof pdb
First published on: 26-05-2023 at 14:27 IST