2023 Yamaha FZX: दिग्गज जपानी कंपनी Yamaha भारतात आपली स्पोर्ट्स आणि रेट्रो स्टाईल मोटरसायकल लाँच करण्याची तयारी केली आहे. हे Yamaha FZ-X चे नवीन मॉडेल असेल. विशेष म्हणजे, ड्युअल चॅनल ABS पर्यायासह येणारी ही देशातील पहिली १५० सीसी बाईक असेल. नवीन FZ-X चाचणी दरम्यान अलीकडेच दिसली आहे. ज्यामध्ये त्याचे नवीन डिझाइन आणि फीचर्स समोर आले आहेत.

Yamaha FZ-X मध्ये काय आहे खास?

नवीन Yamaha FZ-X ला DRLs आणि प्रोजेक्टर युनिटसह वर्तुळाकार हेडलॅम्प मिळेल. यात नवीन हेडलँपसह पारदर्शक विंडस्क्रीनही मिळेल. याशिवाय, यात Xpulse 200 dirt-bike प्रमाणेच फ्रंट फेंडर देखील मिळेल. नवीन FZ-X मध्ये नवीन सोनेरी रंगाच्या मिश्रधातूंसह काही कॉस्मेटिक अद्यतने मिळणार आहेत. हे नवीन कलर ऑप्शनमध्ये देखील सादर केले जाऊ शकते. बाईकचे सर्वात महत्त्वाचे अपडेट ड्युअल चॅनल एबीएससह उत्तम ब्रेकिंग सिस्टम असेल.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
Tata Punch Car
ऐकलं का…टाटाची ‘ही’ सुरक्षित कार १ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI?  
land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?
Gold Silver Price
Gold-Silver Price on 28 February 2024: सोन्याच्या दरात आज कोणताही बदल नाही, पाहा काय आहे १० ग्रॅम सोन्याचा भाव

(हे ही वाचा: TVS Ronin की Keeway SR 250 कोणती बाईक धावणार सुसाट, पाहा फीचर, किंमत अन् इंजिनपासून सर्वकाही…)

Yamaha FZ-X इंजिन, वेग आणि मायलेज

नवीन यामहा FZ-X मध्ये कोणतेही यांत्रिक बदल होणार नाहीत. याला पूर्वीप्रमाणेच १४९ cc क्षमतेचे, सिंगल सिलेंडर, एअर कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन १२.२ hp ऊर्जा निर्माण करते. नवीन बाइकमध्ये FZ-X स्मार्टफोन ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे फीचर असेल. ही बाईक ५-स्पीड गिअरबॉक्ससह येते. या मोटरसायकलचा टॉप स्पीड ११५ किमी प्रतितास आहे. बाइकला सुमारे ४५ किमी प्रति लीटर मायलेज मिळते.

Yamaha FZ-X बाईक स्मार्ट फीचर्स

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणारी FZ-X ही भारतातील पहिली यामाहा बाईक होती. ते यामाहाच्या वाय-कनेक्ट अॅपशी कनेक्ट केले जाऊ शकते. यासह, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आयकॉनद्वारे स्मार्टफोनचा संदेश आणि कॉलची माहिती उपलब्ध आहे. याशिवाय अॅपच्या माध्यमातून बाईक शेवटची कुठे पार्क केली होती, मायलेज किंवा कोणत्याही प्रकारची बिघाड झाल्यास त्याची माहिती मिळते.

(हे ही वाचा: 50 हजारांपेक्षा कमी किंमतीतील ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळेल मोठ्या रेंजची हमी)

Yamaha FZ-X किंमत

FZ-X सध्या तीन रंगांमध्ये विकले जाते. मॅट कॉपर, मेटॅलिक ब्लू आणि मॅट ब्लॅक या रंगाचे समावेश आहे. त्याची सुरुवातीची किंमत १.३५ लाख रुपये आहे. नवीन FZ-X देखील काही आठवड्यांत लाँच होईल. यात अनेक नवीन फीचर्स आणि कॉस्मेटिक अपडेट्स मिळतील. नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. १.४ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. नवीन बाईक Hero Xtreme 160R, TVS Apache RTR 160 4V, Honda X-Blade, Bajaj Pulsar NS160 आणि Suzuki Gixxer 155 शी स्पर्धा करेल.