bmw launch bmw xm with hybrid power train | Loksatta

बहुप्रतीक्षित BMW XM ग्राहकांसाठी सादर, पेट्रोल – इलेक्ट्रिक दोन्हीवर चालते, इलेक्ट्रिक मोडवर देते इतकी रेंज

बीएमडब्ल्यूने BMW XM लाँच केली आहे. अनेक दिवसांपासून ग्राहकांना या कारबाबत उत्सुकता होती. कार अनोख्या वैशिष्ट्यांसह बाजारात लाँच झाली आहे. कारला खास डिझाईन देण्यात आला असून ती माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानावर चालते.

बहुप्रतीक्षित BMW XM ग्राहकांसाठी सादर, पेट्रोल – इलेक्ट्रिक दोन्हीवर चालते, इलेक्ट्रिक मोडवर देते इतकी रेंज
बीएमडब्ल्यू (pic credit – bmw)

बीएमडब्ल्यूने BMW XM लाँच केली आहे. अनेक दिवसांपासून ग्राहकांना या कारबाबत उत्सुकता होती. कार अनोख्या वैशिष्ट्यांसह बाजारात लाँच झाली आहे. कारला खास डिझाईन देण्यात आले असून ती माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानावर चालते. वाहनात पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर आहे. त्यामुळे दोन्ही मिळून वाहनाला चालण्यासाठी मोठी उर्जा देतात. कारचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे, कार ८५ किलोमीटर पर्यंत केवळ इलेक्ट्रिक बॅटरीवर चालवता येऊ शकते.

असे आहे वाहनाचे डिझाईन

कारच्या पुढील भागात किडनी ग्रील आणि स्लिक एलईडी रनिंग लॅम्पसोबत हेडलॅम्प देण्यात आले आहेत. फ्रेंट बंपरमध्ये मोठे एअर इन्टेक देण्यात आले आहेत. कारमध्ये २३ इंचचे व्हील्स देण्यात आले आहेत. २२ इंच व्हीलचा पर्याय देखील उपलब्ध आहे. मागील बाजूस एलईडी टेल लाईट्स देण्यात आले आहेत. तसेच मोठ्या डिफ्यूजरसोबत क्वाड एक्झोस्ट देण्यात आला आहे.

(हिरोने लाँच केली ‘ही’ दमदार बाईक, वेग मर्यादा ओलांडल्यावर देते सूचना, जाणून घ्या किंमत)

इंटेरियरचे बोलायचे झाल्यास कार ड्युअल टोन थीमसह येते. यात लेदरचा वापर करण्यात आला आहे. हेडलाईनरमध्ये १०० एलईडी आहेत. त्याचबरोबर, कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि आईड्राइव्ह ८ सह मोठी टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट हेड युनिट, हेड अप डिस्प्ले आणि कनेक्टिव्हिटी फीचर बरोबर ड्राईव्हर असिस्टेंट सिस्टिम देण्यात आली आहे.

कारमध्ये देण्यात आले इंजिन

एक्सएम प्लग इन हाईब्रिड पावरट्रेनसह लाँच करण्यात आली आहे. कारमध्ये ४.४ लीटर व्ही ८ इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन इलेक्ट्रिक मोटरसह जोडण्यात आले आहे. हे दोन्ही मिळून कारला ६४४ बीएचपीची शक्ती देतात आणि ८०० एनएमचा टॉर्क जनरेट करतात.

(तुम्ही व्होडाफोन आयडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचाच… तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता)

कार ० ते १०० किमीचा वेग केवळ ४.३ सेकंदात पकडे असा कंपनीचा दावा आहे. कारचा सर्वोच्च वेग २५० किमी आहे. या एसयूव्हीमध्ये २५.७ केडब्ल्यूएचचा लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो एसयूव्हीला १४० किंमी प्रति तासाचा सर्वोच्च वेग देतो. या बॅटरी पॅकसह कार इलेक्ट्रिक मोडवर ८५ किमी चालू शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 11:09 IST
Next Story
Citroen ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात करणार धमाकेदार एंट्री; जाणून कशी असेल ही कार…