आपण प्रत्येकजण चार चाकी आणि दुचाकी वापरतो. शहरांमध्ये रोजच्या वापरासाठी किंवा जवळचे अंतर जाण्यासाठी आपण बाईकचा वापर करत असतो. मात्र वाहन हे कोणतेही असो त्याची काळजी घेणे हे आवश्यकच असते. त्याची काळजी म्हणजे बाईकचे इंजिन, ऑइल, आणि इतर सर्व्हिसिंग याचा समावेश होत असतो. वाहनाचा प्रकार काहीही असो, त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे इंजिन. वाहनाचे इंजिन योग्यरित्या कार्यरत ठेवण्यासाठी इंजिन ऑइल सर्वात महत्वाची भूमिका बजावते.

गाडीमधले ऑइल हे एक प्रकारचे वंगण आहे. ज्यामुळे इंजिनमधील सर्व भाग एकमेकांवर घासले जात नाहीत. ते इंजिनच्या आत झीज होण्यास प्रतिबंध करते. परंतु काही काळानंतर ते बदलणे आवश्यक आहे, कारण ते इंजिन चालू असताना हळूहळू खराब होऊ लागते. पण आता तुम्ही विचार करत असाल की बाईकचे इंजिन ऑइल केव्हा बदलले पाहिजे हे कसे कळेल. आज आपण असे चार पर्याय पाहणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या बाईकचे इंजिन ऑइल कधी बदलले पाहिजे हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : Hyundai Cars: ह्युंदाई लवकरच लॉन्च करणार ‘ही’ मायक्रो SUV; टाटा पंचसह ‘या’ गाडयांशी करणार स्पर्धा

१. तुम्ही तुमच्या बाईकच्या इंजिनमधून येत असलेला आवाज काळजीपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात आवाज येत असेल तर तुमच्या बाईकचे इंजिन ऑइल बदलावे लागेल. ऑइल कमी झाल्यामुळे इंजिनमधील पार्टस एकमेकांवर घासून आवाज करायला लागतात. त्यामुळे गाडीचा आवाज देखील जोरामध्ये येतो.

ऑइलचा रंग तपासावा

आता जवळजवळ सर्व बाइक्सना इंजिन ऑइल तपासण्यासाठी डिपस्टिक मिळू लागली आहे. ज्याद्वारे तुम्ही इंजिन ऑईलची स्थिती तपासू शकता. जेव्हा तुमच्या बाईकचे इंजिन थंड असते तेव्हा याच्या मदतीने तुम्ही बाईकचे इंजिन ऑइल तपासू शकता. जर हे तपासताना जर का इंजिन ऑइल गडद रंगांचे झाले असेल तर त्वरित बाईकचे इंजिन ऑइल बदलणे आवश्यक आहे.

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! MG मोटरने सुरू केले ‘या’ सर्वात लहान कारचे उत्पादन; १९ एप्रिल रोजी होणार लॉन्च, किंमत फक्त…

ऑइलची लेव्हल तपासावी

अनेक बाइक्समध्ये, इंजिन ऑइलची पातळी डिपस्टिकद्वारे आणि काहींमध्ये विंडोच्या माध्यमातून तपासली जाऊ शकते. इंजिनमध्ये ठराविक प्रमाणात ऑइल असणे गरजेचे आहे. म्हणूनच जर इंजिन ऑइलची पातळी कमी झाली असेल तर ते बदलले पाहिजे.

नवीन काळामध्ये ऍडव्हान्स बाइक्समध्ये इंजिन सेन्सर हे फिचर उपलब्ध असते. ज्याद्वारे मोटारसायकलच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर वॉर्निंग लाइट दिसू लागतो. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बाइकच्या इंजिन ऑइलची स्थिती जाणून घेऊ शकता आणि त्यावर लक्ष ठेवू शकता.