डेकॅथलॉनची नवीन ई-सायकल भारतामध्ये लॉन्च; 380 Wh बॅटरी पॅक, 250W मोटरसह अनेक अत्याधुनिक फीचर्स, किंमत आहे…

डेकॅथलॉनने लॉन्च केलेल्या या नव्या ई-सायकलबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या…

Decathlon Rockrider E-ST100 electric bicycle
डेकॅथलॉनची नवी इलेक्ट्रिक सायकल (फोटो – Financial Express)

Decathlon Rockrider E-ST100 electric bicycle: डेकॅथलॉन हा सध्या भारतातील क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ब्रॅंड्सपैकी एक आहे. या कंपनीद्वारे क्रीडा क्षेत्रातील अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते. डेकॅथलॉनची ट्रेंकिंग, कॅम्पिंग यांच्याशी संबंधित उत्पादनांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये पदार्पण केले. त्यांची रॉकराईडर E-ST100 इलेक्ट्रिक सायकल बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आली. सध्या बंगळुरुमध्ये काही शहरांमध्ये ही सायकल खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

डेकॅथलॉन रॉकराईडर E-ST100 इलेक्ट्रिक सायकलची वैशिष्ट्ये:

डेकॅथलॉनच्या नव्या कोऱ्या ई-सायकलमध्ये 250W रीअर हब मोटर बसवण्यात आली आहे. त्यामोटरद्वारे 42 Nm पीक टॉर्क जनरेट होतो. या ई-सायकलची हायस्पीड २५ किमी प्रतितास इतकी आहे. यामध्ये 380 Wh सॅमसंग लिथियम-आयन सेल बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी सहा तास इतका कालावधी लागतो. एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल सपाट भूभागावर १०० किमीपर्यंत चालवता येते.

कंपनीचा असा दावा आहे की, रॉकराईडर E-ST100 इलेक्ट्रिक सायकल मॅक्झिमम पॉवर आणि मॅक्झिमम कटऑफ स्पीडसाठी ARAI प्रमाणित आहे. BIS द्वारे या सायकलच्या बॅटरीच्या सुरक्षा आणि गुणवत्ता यासंबंधित प्रमाण देण्यात आले आहे. चालकाच्या उंचीनुसार ही सायकल तयार करण्यात आली असून ती मीडियम (Medium) आणि लार्ज (Large) अशा दोन उपलब्ध आहे. इको, स्टॅन्डर्ड आणि बूस्ट अशा पेडल असिस्टेंट मोड पाहायला मिळतात. सायकलच्या फ्रेमवर लाइफ टाइम वॉरंटी आणि बॅटरीवर २ वर्ष किंवा ५०० चार्जिंग सायकल वॉरंटी देण्याचे आश्वासन डेकॅथलॉन कंपनीने दिले आहे. भारतामध्ये या सायकलची किंमत ८४,९९९ रुपये इतकी आहे.

आणखी वाचा – BMW Motorrad: भारतात लॉन्च झाली R 18 Transcontinental बाईक, SUV सारखे पॉवरफुल इंजिन आणि…

नव्या ई-सायकलबद्दल भाष्य करताना डेकॅथलॉन स्पोर्ट्स इंडियाच्या ई-सायकल प्रोजेक्ट लीडर एबिन मॅथ्यू म्हणाले, रॉकराईडर E-ST100 इलेक्ट्रिक सायकलच्या माध्यमातून आम्ही नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहोत. ग्राहकांसाठी वाहतुकीसाठी सोप्पा पर्याय मिळावा यासाठी आम्ही ही नवी सायकल लॉन्च केली आहे. बंगळुरु शहरामध्ये सायकल चालवण्याचे, ई-सायकलचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बंगळुरुमध्ये हे नवे उत्पादन आम्ही सर्वात आधी लॉन्च केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 19:42 IST
Next Story
BMW Motorrad: भारतात लॉन्च झाली R 18 Transcontinental बाईक, SUV सारखे पॉवरफुल इंजिन आणि…
Exit mobile version