Do not fill fuel tank completely: भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहन्यांच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. असे असले तरीही बहुतांश लोक प्रवासासाठी पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पसंती दर्शवतात. वाहनांमध्ये इंधन भरणे हे काम फार कटकटीचे असते. काही वेळेस पेट्रोल पंपावर वाहनांची लांबचलांब रांग असते. यामुळे पेट्रोल/ डिझेल भरण्यासाठी जायचे म्हटल्यावर अनेकांना कंटाळा येतो. यामुळे बरेचसे लोक एकदाच वेळी गाडीची पूर्ण टाकी फुल करुन घेत असतात. लांबच्या पल्ल्याचा प्रवास करतानाही लोक पेट्रोल पंपावर टाकी पूर्ण भरायला सांगतात.

टाकी फुल करण्याची ही सवय वाहनासाठी हानिकारक ठरु शकते. OEM ने दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त इंधन भरले जात असल्याचा दावा केला आहे. ६ मार्च २०२३ रोजी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले. यामध्ये त्यांनी वाहन चालकांना इंधनाची टाकी पूर्णपणे न भरण्याचा सल्ला दिला आहे. पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने Wrong tank capacity याबाबत कायदेशीर मेट्रोलॉजी विभागाला निवदने केली होती. यातून वाहनांच्या टाकीच्या एकूण क्षमतेच्या तुलनेमध्ये ८०-८५ टक्के इंधन भरणे योग्य असते असे स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – Ertiga, Creta चा गेम होणार; देशात येतेय सर्वात स्वस्त ७ सीटर कार, किंमत आहे फक्त…

गाडीमधील इंधनाची टाकी संपूर्ण का भरु नये?

  • पेट्रोल पंपांमधील ज्या भूमिगत टाक्यांमध्ये इंधन साठवले जाते त्या टाक्यांमधील वातावरण कमी असते. गाडीच्या टाकीचे तापमान अधिक असते. इंधन गाडीच्या टाकीमध्ये भरल्यानंतर त्याला विस्ताराला जागा असावी म्हणून टाकी फुल न करण्याचा सल्ला दिला जातो.
  • गाडी सुरु झाल्यावर गॅसोलीनला बाष्प निर्मितीसाठी जागा आवश्यक असते. असे झाले नाही, तर इंजिनाच्या कार्यक्षमतेमध्ये बाधा येऊन गाडी चालवताना अडथळा निर्माण होऊ शकतो. टाकीमध्ये अधिक प्रमाणात इंधन असल्याने जास्त प्रमाणात हायड्रोकार्बन प्रदूषण होते.
  • जर एखाद्या गाडीमध्ये टाकी पूर्णपणे भरलेली असेल आणि ती उतारावर पार्क केली असेल, तर अशा वेळी टाकीतून गळती होण्याची शक्यता असते. हा प्रकार घडू नये यासाठीही वाहनांमधील टाकीमध्ये थोडी जागा शिल्लक असणे आवश्यक मानले जाते.