Ratan Tata Car Collection: देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक रतन टाटा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. रतन टाटा यांचे नाव जगभरात उद्योगाशिवाय सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखलं जातं. रतन टाटा जितके मोठे उद्योगपती आहेत, तितकेच उदार त्यांचे व्यक्तिमत्व आहे आणि याची अनेक उदाहरणेही आपल्या समोर आहेत. रतन टाटा आज २८ डिसेंबर रोजी त्यांचा ८६ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. चला या निमित्ताने टाटा मोटर्सची मालकी आणि जॅग्वार-लँडरोवर सारख्या आलिशान कार तयार करणाऱ्या टाटांची आवडती कार कोणती पाहूया…

रतन टाटांच्या ताफ्यात कोणत्या कार?

Ferrari California

फेरारी कॅलिफोर्निया हे रतन टाटा यांच्या आवडत्या मॉडेलपैकी एक आहे. रतन टाटा हे वाहन चालवताना अनेकदा दिसले आहेत. ही कार ४.३-लिटर V८ इंजिनद्वारे समर्थित आहे जी ४९० PS आणि ५०४ Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने हे मॉडेल बंद केले असले तरी, फेरारीने लॉन्च केलेल्या सर्वात लोकप्रिय कारपैकी ही एक आहे.

Mercedes Benz S-Class

रतन टाटा यांच्याकडे मर्सिडीज-बेंझ एस-क्लास कार देखील आहे. ही एक अद्भुत कार आहे. ही कार पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे २९९६ cc/ V6 (S ४५० प्रकार), २९२५ cc/ L6 (S 350 d प्रकार), आणि ३९८२ CC/ V8 (S 63) मध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत १.६२ कोटी रुपये इतकी आहे. 

Land Rover Freelander

रतन टाटा यांच्याकडे Land Rover Freelander ही कार देखील आहे. २०१४ मध्ये कंपनीने ही कार त्यांच्या पोर्टफोलिओतून हटवली. या कारचं एक मॉडेल रतन टाटा यांच्या गॅरेजमध्ये आहे. या कारमध्ये चार सिलेंडर डिझेल इंजिन आहे. जे १९० PS आणि ४२० Nm टॉर्क जनरेट करते.

Tata Nexon

नेक्सॉन ही टाटा मोटर्सची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. सब-४ मीटर विभागांतर्गत ही सर्वाधिक विक्री होणार्‍या एसयूव्हींपैकी एक आहे. टाटा गेल्या काही काळापासून निळ्या रंगाच्या डिझेल इंजिन नेक्सॉनमध्ये फिरताना दिसत आहे. कार दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. हे १.२ L टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन पेट्रोल आणि १.५ L Revotorq डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रतन टाटा यांच्याकडे अगदी रेग्युलर हॅचबॅक कारपासून ते लग्झरी कार्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. आता रतन टाटा भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV वापरताना दिसतात. भारतात टाटा मोटर्स सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्सची विक्री करणारी कंपनी आहे.