चारचाकी, दुचाकी, रिक्षा, टॅक्सी इत्यादी कोणत्याही प्रकारचे इंधनावर चालणारे वाहन असूदे, नेहमी गाडीत पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पंपावर जात असतात. मात्र, अनेकदा वाहनचालक आपल्या गाडीमध्ये योग्य प्रमाणात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधने भरली नसल्याची तक्रार करत असतात. ज्याला अनेक जण पेट्रोल मारणे असेदेखील म्हणतात.

तुम्ही भरलेल्या रकमेमध्ये जितके इंधन येणे अपेक्षित असते, त्यापेक्षा कमी इंधन भरले गेले तर त्या प्रकाराला पेट्रोल मारणे म्हणतात. अनेकदा याबद्दल आपण बातम्यांमधून वाचलेले आणि पाहिलेले असते, तर काहींना याचा अनुभवसुद्धा आलेला असू शकतो. मात्र, पेट्रोल पंपावर आपली अशी फसवणूक होऊ नये यासाठी काही सोप्या, परंतु तितक्याच महत्त्वाच्या काही टिप्स आहेत; त्या प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. या टिप्स हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजतात.

Health Benefits of Castor Oil
रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

हेही वाचा : Car tips : हिवाळ्यात कशी घ्यावी गाडीची योग्य काळजी? पाहा या सात सोप्या टिप्स….

पेट्रोल भरताना घ्यावयाची काळजी :

१. शून्य पाहणे

गाडीमध्ये पेट्रोल भरून घेताना पंपावर दिसणाऱ्या मीटरवर कायम ० आकडा तपासून पाहावा. आपल्याला पंपावरील कर्मचारी नेहमी शून्य तपासून पाहायला सांगतात. मात्र, कुणी तसे न केल्यास तुम्ही स्वतः आठवणीने त्या पंपावरील मीटर खरंच शून्यावर आहे की नाही ते तपासून घ्या. जर मीटरवरील आकडा अधिक असल्यास तुमच्या गाडीमध्ये प्रमाणापेक्षा कमी पेट्रोल भरले जाऊन त्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

२. ठराविक किमतीचे पेट्रोल भरू नका

आलेल्या ग्राहकाकडून पेट्रोल मारण्याचे किंवा चोरण्याच्या अनेक युक्त्या असतात. त्यापैकी एक म्हणजे, काही विशिष्ट किमतींसाठी आधीच कमी प्रमाणात पेट्रोलची पातळी सेट करून ठेवणे. म्हणजे, बरेच जण २००, ५०० किंवा १,००० रुपयांचे पेट्रोल भरतात. त्यामुळे पेट्रोल भरून देणारे कर्मचारी कधी कधी अशा ठराविक आकड्यांवर आधीच पेट्रोलची कमी पातळी/व्हॉल्यूम सेट करून ठेवतात, त्यामुळे आपोआपच तुम्हाला प्रमाणापेक्षा कमी इंधन मिळते आणि तुमचा तोटा होतो. असे होऊ नये म्हणून यातही असामान्य अशा रकमेचे इंधन त्यांना भरण्यास सांगावे. उदाहरणार्थ २३५ रुपये, ५४५ किंवा १,३५५ अशा किमतीच्या स्वरूपात गाडीमध्ये पेट्रोल भरून घ्यावे.

३. पॉवर पेट्रोल

अनेकदा तुम्ही एखाद्या पंपावर जाऊन त्यांना ठराविक किमतीचे पेट्रोल भरण्यास सांगता. तुमचे सर्व लक्ष असूनदेखील गाडीमध्ये कमी प्रमाणात पेट्रोल भरले जाते. तेव्हा तुम्ही असे का झाले असे विचारल्यावर, गाडीमध्ये भरलेले इंधन हे ‘पॉवर पेट्रोल’ असल्याचे तुम्हाला सांगितले जाते. पेट्रोल पंपावर साधे आणि पॉवर अशा दोन प्रकारचे पेट्रोल मिळते, त्यामुळे कधीही गाडीत इंधन भरण्याआधी ते कोणत्या प्रकारचे इंधन आहे हे विचारून घ्यावे. गाडीमध्ये पॉवर पेट्रोल घातल्याने काही नुकसान नसले तरी त्याचा विशेष उपयोगदेखील नसतो, असे हिंदुस्थान टाइम्सच्या लेखावरून समजते. या पॉवर पेट्रोलची किंमत साध्या पेट्रोलपेक्षा अधिक असल्याने तुमचा तोटा होतो.

हेही वाचा : Car tips : गाडी सारखी बंद पडत आहे? मग वाहनातील ‘हा’ भाग बदलण्याचा संकेत असू शकतो; पाहा….

४. माहीत असलेल्या पंपावर इंधन भरणे

माहीत असलेल्या पेट्रोल कंपनीच्या पंपावर इंधन भरून घ्यावे. इतर सामान्य पेट्रोल पंपावर शक्यतो जाऊ नये.

५. क्वाँटिटी तपासून घ्यावी

तुम्हाला जर तुमच्यासोबत पेट्रोल पंपावर फसवणूक होत आहे असे वाटत असल्यास, तेथील कर्मचाऱ्यांना पेट्रोलची क्वाँटिटी तपासून दाखवण्यास सांगा. यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींची व्यवस्थित जाण आहे, असे समोरच्याला समजते. त्यासोबतच जर काही गडबड असेल, तर ती लगेच तुमच्या समोर येईल.