How to check car tyre conditions: कोणत्याही वाहनासाठी, त्याचे टायर आणि इतर पार्ट्स चांगल्या स्थितीत असणे खूप महत्वाचे आहे. जर गाडीचे टायर चांगल्या स्थितीत नसतील तर गाडी रस्त्यावर व्यवस्थित चालणार नाही. म्हणून, तुमच्या वाहनाच्या टायर्सची नेहमी काळजी घ्या आणि वेळोवेळी ते तपासत राहा. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला त्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कारच्या टायर्सची स्थिती जाणून घेऊ शकता.

अपेक्षेपेक्षा जास्त टायर गरम होणे

जर तुम्हाला गाडी चालवताना टायर खूप गरम होत आहेत असे वाटत असेल, तर हा तुमच्यासाठी एक इशारा असू शकतो. टायर गरम होणे हे हवेच्या दाबात (Air pressure) वाढ किंवा टायरच्या खराब दर्जामुळे होऊ शकते. यामुळे टायर फुटण्याचा धोका वाढतो.

टायरची हवा निघणे

जर तुमच्या टायरमधून हवा बाहेर पडू लागली किंवा त्याचा दाब कमी झाला तर याचा अर्थ टायरमध्ये कोणत्या तरी प्रकारचं लिकेज होत आहे असा होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

टायरमध्ये भेगा

टायरच्या पृष्ठभागावर भेगा, फाटलेली जागा किंवा टायर खराब होण्याचे चिन्ह दिसल्यास, टायर ताबडतोब बदला.

टायरचा आवाज

जर तुम्हाला गाडी चालवताना विचित्र आवाज ऐकू येत असेल, तर ही लक्षणे खराब झालेल्या टायरची आहेत.

टायरमध्ये फुगवटा

टायरमध्ये फुगवटा किंवा बम्प येणे अत्यंत धोकादायक असू शकते. टायरच्या बाहेरील थरात कमकुवतपणा असल्यास असे घडते.

टायरचं प्रेशर

नेहमी टायरचं प्रेशर चेक करत राहिलं पाहिजे. जेव्हा टायरचा दाब कमी असतो तेव्हा टायरचे तापमान वाढते आणि त्यामुळे टायर फुटण्याचा धोका देखील वाढतो.

हेही वाचा

गाडी चालवण्यात अडचण

जर गाडी चालवताना तुम्हाला असे वाटत असेल की गाडी नीट चालत नाहीये किंवा टायरची ग्रिप कमी झाली आहे, तर ताबडतोब तुमच्या गाडीचे टायर बदला.

ब्रेक लावताना झटका बसणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रेक लावताना जर तुम्हाला टायरमध्ये झटका किंवा कंपन जाणवले तर याचा अर्थ टायर खराब झाला आहे. तो ताबडतोब बदला.