Hyundai ही देशातील एक अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीने आज(शुक्रवारी) बहुचर्चित अशी नवीन Grand i10 NIOS ही कार लाँच केली. Grand i10 NIOS या कारचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात. लाँच झाल्यानंतर ही कार कंपनीच्या सध्याच्या रेंजमधील सर्वात कमी किंमतीची हॅचबॅक कार म्हणून ओळखली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन ग्रँड i10 NIOS हॅचबॅक कारचा लुक हा स्पोर्टी असून त्याला ट्रेंडी डिझाईन देण्यात आले आहे . ह्युंदाई कंपनीच्या हॅचबॅक कार्स अनेक वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहेत. मात्र भारतीय बाजारात सध्या ग्रँड i10 जास्त पसंती मिळत आहे.११,००० रुपयांच्या टोकन अमाऊंटवर Hyundai Grand i10 Niosचे बुकिंग सुरु झाले आहे. याच्या नवीन मॉडेलमध्ये नवीन डिझाईन अनिफीचर्स देण्यात आली आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही कारचे बुकिंग करू शकता.

हेही वाचा : Tata Altroz: अवघ्या ५५ हजारांत घरी घेऊन या नवीकोरी हॅचबॅक टाटा अल्ट्रोझ, देणार जबरदस्त मायलेज

Grand i10 NIOS चे फीचर्स

नवीन ग्रँड i10 NIOS 6 ही कार पोलर व्हाईट(Polar White), टायटन ग्रे(Titan Grey), टायफून सिल्व्हर(Typhoon Silver) आणि स्पार्क ग्रीन(Spark Green), टील ब्ल्यू(Till blue), तसेच २ ड्युअल टन कलर या रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. Hyundai Motors ने या सिरीजमध्ये ८ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले येतो. तसेच फास्ट यूएसबी चार्जर, क्रूझ कंट्रोल, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल, अँड्रॉइड ऑटो ,अ‍ॅपल कारप्लेची कनेक्टिव्हिटी, व्हॉईस रेकग्निशन आणि मागे बसणाऱ्यांसाठी एसीचा व्हेंट देण्यात आला आहे.

ह्युंदाईची ही गाडी मॅन्युअल मोडवर एका लिटरमध्ये २०.७ किमी धावते. तर AMT हे मॉडेलची कार एका लिटरमध्ये २०.१ किमी धावते. या कारमध्ये डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन एलईडी डीआरएल, १५ इंचाचे अलॉय व्हील्स, शार्क फिन अँटेना आणि मागच्या बाजूला आधीसारखेच टेललाईट्स देण्यात आली आहेत. यामध्ये म्हणून ४ एअरबॅग्स , टॉप मॉडेलमध्ये ६ एअरबॅग्स, तयार प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम , पार्किंग सेन्सर्स अशी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.

हेही वाचा : Bajaj ने आणली शक्तिशाली इंजिनची ‘ही’ कार; मायलेजपासून किंमतीपर्यंत सर्व काही आहे बेस्टच बेस्ट

किती असणार किंमत ?

नवीन 2023 Hyundai Grand i10 NIOS ची किंमत ५,६८,५०० रुपये आहे. हे नवीन मॉडेल कॉस्मेटिक अपग्रेडमध्ये येते. तसेच यात ३० नवीन फीचर्स व २० सेफ्टी फीचर्स यात देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai has launched the new grand i10 nios in india with attractive features tmb 01
First published on: 20-01-2023 at 16:36 IST