स्वतःची चारचाकी गाडी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकजण हे स्वप्न लवकर पुर्ण व्हावे या प्रयत्नात असतात. त्यासाठी बजेटचं गणित सांभाळत किंवा इइमआयचा पर्याय निवडुन कार खरेदी करण्याचे ठरवले जाते. आता अनेकजण येणाऱ्या सणांच्या शुभमुहूर्तावर नवीन गाडी घेण्याचा विचार करत असतील. ऑटोमोबाईल मार्केटची देखील ‘दिवाळी’ आता सुरू होईल. कारण दिवाळीला नवीन कार, बाइक, स्कूटर विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी जमते. तुम्हीदेखील दिवाळीला नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी बजेटमध्ये बसणाऱ्या टॉप पाच कार कोणत्या आहेत जाणून घ्या.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा सिग्मा (Maruti Suzuki Grand Vitara Sigma)

  • ग्रँड विटारा सिग्मा हे मारुती सुझुकीचे लेटेस्ट प्रोडक्ट आहे.
  • या व्हेरीयंटची किंमत १०.४५ लाख रुपये (एक्स शोरूम किंमत) आहे.
  • या कारामधील माईल्ड हायब्रीड इंजिन १०३ पीएस आणि १३६.८ एनइम जनरेट करते.

आणखी वाचा : नो कॉस्ट इएमआय, शून्य डाउन पेमेंट आणि पाच हजारांचा कॅशबॅक! जाणून घ्या कोणत्या स्कूटरवर मिळतेय ही आकर्षक ऑफर

टोयोटा हायरायडर (Toyota Hyryder)

  • टोयोटा हायरायडरच्या बेस इ पेट्रोल माईल्ड हायब्रीड व्हेरीयंटची किंमत १०.४८ लाख रुपये (एक्स शोरूम किंमत) आहे.
  • टोयोटा हायरायडर आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा या गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आल्या आहेत, त्यामुळे यांमध्ये बरेच साम्य आहे.

किआ कॅरेन्स प्रीमियम (Kia Carens Premium)

  • ही कार यावर्षाच्या सुरूवातीला लाँच करण्यात आली होती. वीएफइम (VFM) या फीचरमुळे ही कार कमी कालावधीत लोकप्रिय झाली.
  • एन्ट्री लेवल प्रीमियम व्हेरियंटची किंमत पेट्रोलसाठी – ९.५९ लाख रुपये (एक्स शोरूम किंमत) तर प्रेस्टिजसाठी १०.७० लाख रुपये (एक्स शोरूम किंमत) आहे.
  • सहा एअरबॅग्ज, ईएसपी, हिल-स्टार्ट असिस्ट, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि रियर पार्किंग सेन्सर हे फीचर्स बेस व्हेरियंटमध्ये देण्यात आले आहेत.

महिंद्रा स्कॉर्पिओ एन झेड २ ( Mahindra Scorpio N Zed 2)

  • भारतात नुकतीच लाँच झालेली महिंद्रा स्कॉर्पिओ एन झेड२, झेड ४, झेड ६, झेड ८ आणि झेड ८ एल या पाच ट्रिम लेव्हलमध्ये विकली जाते.
  • बेस झेड २ ची किंमत पेट्रोल व्हेरियंटसाठी ११.९९ लाख रुपये आणि डिझेल मॅन्युअल व्हेरियंटसाठी १२.४९ लाख रुपये आहे.

आणखी वाचा : मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६० हजारांपर्यंतची मोठी सूट; पाहा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ह्युंडाय क्रेटा इएक्स (Hyundai Creta EX)

  • मध्यम आकाराच्या एसयुव्ही विक्रीमध्ये गेले अनेक वर्ष ह्युंडाय क्रेटा इएक्स आघाडीवर आहे. याचे मुख्य कारण या कारचे आकर्षक फीचर्स आहेत.
  • ‘ह्युंडाय क्रेटा इएक्स’ची किंमत पेट्रोल मॉडेलसाठी ११.३८ लाख रुपये आणि डिझेल मॉडेलसाठी १२.३२ लाख रुपये (एक्स शोरूम किंमत) आहे.