2024 Yezdi Adventure Launched in India: अलीकडे बुलेट, स्पोर्ट्स बाइककडे तरुणाईचा कल वाढत आहे. लाँग ड्राइव्हसाठी अनेक तरुण बुलेटचा वापर करताना दिसतात. त्यामुळे कंपन्याही नवनवीन बाईक सादर करीत असतात. खास करुन तरुणांना बाईकने डोंगरावर जायला आवडते, यासाठी दुचाकी उत्पादक कंपन्या खास साहसी बाईक ऑफर करतात. आता या सेगमेंटमध्ये एक परवडणारी बाईक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे, जी तिच्या इंजिन पॉवरट्रेनमधील महागड्या KTM 390 Adventure आणि Royal Enfield Himalayan 450 ला जोरदार टक्कर देते.

येझदी ही जगातली प्रमुख वाहन उत्पादक कंपनी आहे. आता कंपनीने नवीन बाईक लाँच केली आहे. कंपनीने 2024 Jawa Yezdi Adventure बाईक सादर केली आहे. Jawa Yezdi Adventure ला KTM आणि Royal Enfield च्या तुलनेत नवीन रंग पर्याय मिळतो. ही बाईक न्यू जनरेशन चार कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे, हाय स्पीडसाठी या बाईकला ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही बाईक रस्त्यावर १४० kmph चा टॉप स्पीड देईल, असा कंपनीचा दावा आहे.

(हे ही वाचा : बाजारपेठेत उडाली खळबळ! ‘या’ तुफान मागणी असणाऱ्या कारला टाटा आणतेय दोन CNG सिलिंडरसह, आता मायलेज वाढणार!)

बाईकचे इंजिन

कंपनीने या बाईकमध्ये जावा आणि यझदीच्या इतर बाइक्सप्रमाणेच इंजिन दिले आहे. आणखी बरेच अपडेट्स देखील केले गेले आहेत. या नव्या बाईकमध्ये सुरक्षिततेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आहे, जी बाईकचे दोन्ही टायर हाय स्पीडवर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. खडबडीत रस्त्यावर हाय पॉवर जनरेट करण्यासाठी या बाईकला ३३४ सीसीचे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक २९.६ Hp पॉवर आणि २९.९ Nm टॉर्कसह जबरदस्त परफॉर्मन्स देते. लांब मार्गांसाठी, या बाईकमध्ये १५.५ लीटरची मोठी इंधन टाकी आहे.

बाईकचे मायलेज

कंपनीचा दावा आहे की ही बाईक ३० kmpl पेक्षा जास्त मायलेज देते. बाईकचे वजन १८७ किलोग्रॅम आहे, ज्यामुळे तुटलेले रस्ते आणि उतारावर नियंत्रण करणे सोपे होते. या बाईकची सीटची उंची ८१५ मिमी आहे, ज्यामुळे पर्वतांवर समतोल राखण्यात कोणतीही अडचण येत नाही. ही बाईक ग्‍लेशियर व्हाईट, मेग्‍नाइट मेरून, वोल्‍फ ग्रे, टॉर्नेडो ब्‍लैक अशा रंगात दाखल करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत किती?

नवीन बाईकमध्ये रायडरला अनेक मोड्स मिळतात. तसेच, यूएसबी चार्जर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, २२० मिमी ग्राउंड क्लिअरन्स, स्विच करण्यायोग्य एबीएस, ड्युअल डिस्क ब्रेक यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २.१० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.