लवकरच लाँच होणार KIA EV6! ‘या’ १२ शहरांमध्ये बुकिंगसाठी कार असेल उपलब्ध

या कारचे फक्त १०० युनिट्स भारतात विक्रीसाठी देण्यात आले आहेत.

Kia-EV6-GT-3-1-620x349
(फोटो: financial express)

Kia EV6 Availability In 12 Cities: किआ मोटर इंडिया (Kia Motor India) २ जून २०२२ रोजी भारतात ब्रँड न्यू आणि पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी सज्ज आहे, ज्याचे नाव EV6 आहे. कंपनीने या कारसाठी भारतात बुकिंग घ्यायला सुरू केले आहे आणि इच्छुक लोक ३ लाख रुपयांच्या टोकन रकमेसह देशभरातील १२ शहरांमधील १५ निवडक डीलरशिपवर ही कार बुक करू शकतात. ही नवीन इलेक्ट्रिक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील बुक केली जाऊ शकते.

कंपनीने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर कारचे बुकिंग सुरू केले आहे कारण या कारचे फक्त १०० युनिट्स भारतात विक्रीसाठी देण्यात आले आहेत.

फोटो: financial express

पाहा शहरांची यादी

ज्या १२ शहरांमध्ये कार उपलब्ध असेल ते म्हणजे, दिल्ली – जयंती किया, गुरुग्राम – धिंग्रा मोटर्स, नोएडा – अलाईड मोटर्स, जयपूर – राजेश मोटर्स, मुंबई – ऑटोबान किया, पुणे – क्रिस्टल ऑटो, अहमदाबाद – सुपरनोव्हा किया आणि कोस्ट किया, चेन्नई – कॅपिटल किया, बंगलोर – एपिटोम ऑटोमोबाईल्स आणि व्हीसीटी सेंट्रल, कोची – इंचॉन किया, हैदराबाद – ऑटोमोटिव्ह किया आणि कार किया, कोलकाता – ईस्टर्न किया. भारतात या कारचे बुकिंग रद्द केल्यावर कंपनी ग्राहकाच्या बुकिंग रकमेतून ५०,००० रुपये कापून घेईल.

फोटो: financial express

भारतात फक्त १०० युनिट्स विकल्या जातील

नवीन किआ EV6 चे फक्त १०० युनिट्स भारतात विकले जातील, त्यामुळे बुकिंग सुरू होताच काही मिनिटांत कार पूर्णपणे विकली जाईल असा अंदाज आहे. EV6 व्यतिरिक्त, कंपनीने EV6 Lite, EV6 Air, EV6 Water आणि EV6 Earth या नावांच्या ट्रेडमार्कसाठी देखील अर्ज केला आहे. ही सर्व EV6 इलेक्ट्रिक कारच्या विविध प्रकारांची नावे असू शकतात. गेल्या वर्षी मे मध्ये सादर करण्यात आलेली, Kia EV6 Hyundai च्या Ionic 5 वर आधारित आहे आणि e-GMP प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kia ev6 to launch soon car will be available for booking in these 12 cities ttg

Next Story
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी