7 Seater Car: देशातील लोकप्रिय कार निर्माता कंपनी महिंद्रा तिच्या एसयूव्ही कारसाठी ओळखली जाते. महिंद्रा स्कॉर्पिओ घेण्याचे लोकांना वेड लागले असले तरी कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणजे महिंद्रा बोलेरो. भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही पैकी एक असणारी महिंद्रा बोलेरो आपल्या दमदार फीचर्स आणि लूकमुळे बाजारात धुमाकूळ घालत आहे.महिंद्राने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात बोलेरोच्या १० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. बोलेरो २००० या वर्षी भारतीय बाजारात आणली गेली होती आणि आत्तापर्यंत या कारचे १४ लाखांहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. खास गोष्ट म्हणजे ही १० लाखांपेक्षा कमी किमतीची लोकप्रिय सात सीटर कार आहे, ज्याची क्रेझ खेड्यापासून शहरांपर्यंत आहे.

महिंद्रा बोलेरो किंमत

महिंद्रा बोलेरोच्या किमती ९.७८ लाखांपासून सुरू होतात आणि टॉप-एंड प्रकारासाठी १०.७९ लाख (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जातात. कंपनीन ते तीन ट्रिममध्ये विकते: B4, B6 आणि B6(O). या एसयूव्हीमध्ये जास्तीत जास्त सात लोक बसू शकतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

(हे ही वाचा : Toyota Hilux चा बँड वाजणार; Mahindra Bolero नव्या अवतारात देशात दाखल, किंमत फक्त…)

महिंद्रा बोलेरो इंजिन

या SUV च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात १४९८ cc चे इंजिन लावले आहे. हे इंजिन ७५ PS कमाल पॉवर आणि २१० Nm पीक टॉर्क बनविण्यास सक्षम आहे. त्याचे इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. यामध्ये कंपनी १६.० किलोमीट प्रति लीटर मायलेज देते.

वैशिष्ट्ये

महिंद्रा बोलेरोचा फेसलिफ्ट नुकताच आणण्यात आला. यामध्ये नवीन बंपर, नवीन लोखंडी जाळी, नवीन हेडलॅम्प, मागील वॉशर आणि वायपर्स आणि फॉग लॅम्पसह पुन्हा डिझाइन केलेला चेहरा समाविष्ट आहे. आतील बाजूस, तुम्हाला ड्रायव्हर इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जी प्रवास केलेले अंतर, इंधन पातळी, गियर इंडिकेटर, दरवाजाचा इशारा, दिवस आणि तारखेसह डिजिटल घड्याळ दर्शवते. यात फॅब्रिक सीट्स, पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग, कीलेस एंट्री आणि 12V चार्जिंग पोर्ट देखील मिळतो.

Story img Loader