प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा देखील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये उतरण्याची तयारी करत आहे. महिंद्रा लवकरच Peugeot Kisbee इलेक्ट्रिक स्कूटरसह इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये पदार्पण करू शकते. आता महिंद्राची इलेक्ट्रिक स्कूटी लाँचपूर्वी रस्त्यावर टेस्टिंग दरम्यान स्पॉट करण्यात आली आहे. ऑटो साइट Zigwheels ने एक्सक्लूसिव्हली महिंद्रा इलेक्ट्रिक स्कूटर टेस्टिंग दरम्यान स्पॉट केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल इतर कोणतीही माहिती समोर आली नसली तरी, लवकरच कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर करू शकते, असा अंदाज लावण्यात आला आहे.

Peugeot Kisbee स्कूटरची वैशिष्ट्ये

महिंद्रा इलेक्ट्रिक स्कूटर Peugeot Kisbee मध्ये Ather ४५०X सारखीच हाय-टेक वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे. स्कूटर ट्यूबलर स्टील चेसिससह येते, जी चांगली पकड आणि हायड्रॉलिक मागील शॉक शोषकांसाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क वापरते. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये १४-इंच चाके आहेत आणि स्कूटरला फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : वाहनप्रेमींसाठी आनंदाची बातमी: Toyota Innova Hycross दमदार फीचर्ससह पुढील महिन्यात लाँच होणार

बॅटरी

Peugeot Kisbee इलेक्ट्रिक स्कूटरचे जागतिक मॉडेल १.६ kWh ४८V लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते, जी काढता येण्याजोगी बॅटरी आहे. या बॅटरीसह स्कूटर ४२ किमीची रेंज आणि ४५ किमी प्रतितास वेगाने धावू शकते. कार्यक्षमतेच्या बाबतीत, महिंद्रा इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आधीपासूनच बाऊन्स इन्फिनिटी E1 सारख्याच क्षमतेसह येण्याची शक्यता आहे.

कधी होणार लाँंच?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिंद्रा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील OLA, Ather, TVS आणि Bounce इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देऊ शकते. सध्या, या स्कूटरची भारतात चाचणी सुरू असून २०२३ च्या अखेरीस ही स्कूटर लॉन्च केली जाईल. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख पर्यंत असण्याची शक्यता आहे.