देशातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत विविध नवीन मॉडेल्स दाखल केले आहेत. यापैकी बहुप्रतीक्षित एक eVX सुद्धा आहे. तसेच मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक वाहन (EV) जागतिक स्तरावर २०२५ मध्ये पदार्पण करणार आहे. तसेच मारुती सुझुकीची भारतीय शाखा या वर्षी स्थानिक बाजारात नवीन-जनरल स्विफ्ट आणि डिझायर लाँच करणार आहे. ऑटोकार यांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेसाठी कॉम्पॅक्ट आणि स्वस्तात मस्त एमपीव्ही (MPV) विकसित करत आहे. अल्ट्रा-कॉम्पॅक्ट मायक्रो MPV सुझुकी स्पेशियावर आधारित असेल आणि २०२६ पर्यंत त्याचे पदार्पण होईल.
मारुती कॉम्पॅक्ट एमपीव्ही स्टाइलिंग :
ऑटोकार यांच्या अहवालानुसार मारुती सुझुकी २०२६ पर्यंत जपान सुझुकी Spacia वर आधारित मिनी एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे. हे मॉडेल कंपनीच्या इतर मॉडेलप्रमाणेच डिझाइनसह ४ मीटर श्रेणी अंतर्गत खाली येईल. याची लांबी ३३९५ मिमी एवढी असून यात सात जण आरामात बसू शकतात. तसेच ही स्वस्तात मस्त असणार असून सरकणारे (स्लायडिंग डोअर) आणि इतर काही फीचर्स यातून काढून टाकले जातील, असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा…EV Sales in India: इलेक्ट्रिक वाहनांना खरेदीदारांची पसंती; विक्रीने ओलांडला १० लाखांचा टप्पा
मारुती कॉम्पॅक्ट एमपीव्ही पॉवरट्रेन :
सुझुकी स्पेशियामध्ये ६५८सीसी, १.२ लिटरचे तीन सिलेंडर इंजिन आणि सौम्य हायब्रीड तंत्रज्ञांसह टर्बो आणि नॉन-टर्बो या प्रकारांमध्ये उपलब्ध केली जाईल, जे अनुक्रमे ६४ पीएस आणि ५२ पीएस पॉवर निर्माण करते. या मायक्रो एमपीव्हीमध्ये २ डब्ल्यू डी आणि ४ डब्ल्यू डी पर्यायांसह ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा सीव्हीटी (CVT ) ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडले आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत उपल्बध करताना यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही दिले जाऊ शकतात. तसेच बलेनो, फ्रॉन्क्स आणि आगामी स्विफ्टसारख्या मारुती मॉडेल्सच्या सध्याच्या श्रेणीप्रमाणेच डॅशबोर्ड लेआउट घेण्याची शक्यता आहे. तसेच आयताकृती हेडलाइट्सचा समावेश आहे आणि गाडी १.२ लिटर मोटर 82 bhp कमाल पॉवर आणि 108 Nm पीक टॉर्क जनरेट करते. लवकरच ही एमपीव्ही कॉम्पॅक्ट भारतात लाँच केली जाईल.