मारुती सुझुकी कंपनीची लोकप्रिय मिनी व्हॅन Maruti Eeco नव्या अवतारात लाँच झाली आहे. मारुतीने आपल्या प्रसिद्ध MPV कार Maruti Eeco चे नवीन अपडेटेड मॉडेल देशांतर्गत बाजारात सादर केले आहेत. नवीन जनरेशन मारुती इको आधीच्या कारपेक्षा दमदार आहे. कंपनीने या कारमध्ये अधिक चांगले सेफ्टी फीचर्स दिले आहेत. ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. जाणून घेऊया गाडीमध्ये काय असेल खास.

Maruti Eeco नवे व्हेरीयंट असे असेल खास

मारुती सुझुकी इको मध्ये, कंपनीने रिक्लिनिंग फ्रंट सीट, केबिन एअर फिल्टर, डोम लॅम्प आणि नवीन बॅटरी सेव्हिंग फंक्शन समाविष्ट केले आहे. याशिवाय या कारमधील सुरक्षेमध्ये सुधारणा करताना त्यात ११ सेफ्टी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रकाशित धोक्याचे दिवे, ड्युअल एअरबॅग्ज, इंजिन इमोबिलायझर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, चाइल्ड लॉक, स्लाइडिंग डोअर्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स इत्यादी उपलब्ध आहेत.

डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टीयरिंग व्हील, एसी आणि हीटरसाठी रोटरी नियंत्रणे केबिनमध्ये किरकोळ सुधारणा आहेत. त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटला ६० लीटर बूट स्पेस मिळते. ही कार ५ रंगांमध्ये ऑफर केली गेली आहे, ज्यात सॉलिड व्हाइट मेटॅलिक सिल्की सिल्व्हर पर्ल मिडनाईट ब्लॅक मेटॅलिक ग्लिस्टेनिंग ग्रे आणि मेटॅलिक ब्रिस्क ब्लू समाविष्ट आहे.

(आणखी वाचा : भारतीय ग्राहक सर्वाधिक मायलेज देणाऱ्या ‘या’ ५ बाईक्सच्या प्रेमात; पाहा यादी )

कंपनीने नवीन मारुती Eeco 5 सीटर आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये सादर केली आहे. याशिवाय या कारचे अॅम्ब्युलन्स प्रकारही उपलब्ध आहे, ज्यामध्ये रुग्णांना आणण्यासाठी आणि नेण्यासाठी पुरेशी जागा आणि सुविधा देण्यात आल्या आहेत. ही कार कॉर्गो आणि टूर प्रकारांमध्ये देखील येते, जी व्यावसायिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

इंजिन

मारुती सुझुकीने आकर्षक लूक आणि उत्तम आसनक्षमतेने सजलेली, कंपनीने अधिक शक्तिशाली इंजिन असलेली ही कार सादर केली आहे. नवीन मारुती ईको कंपनीने नवीन ताजेतवाने इंटीरियर आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सादर केली आहे. या कारमध्ये १.२ लीटर क्षमतेचे K-Series Dual-Jet VVT पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे ८०.७६ PS पॉवर आणि १०४.४ एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, त्याची पेट्रोल आवृत्ती मागील मॉडेलपेक्षा २५ टक्के अधिक मायलेज देईल. पेट्रोल मोडमध्ये ही कार १९.१ kmpl पर्यंत मायलेज देते. तर CNG आवृत्ती २६.७८ kmpl मायलेज देते.

किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कारची सुरुवातीची किंमत ५.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे.